२०२० वर्षात विराट कोहलीच्या भारतीय संघाने आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली आहे. इंदूरच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने श्रीलंकेवर ७ गडी राखून मात केली. या मालिकेतला पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर, दुसऱ्या सामन्यात विजय मिळवणं भारतीय संघासाठी अनिवार्य होतं. विजयासह मालिकेत भारताने १-० अशी आघाडीही घेतली आहे. भारताकडून लोकेश राहुलने सर्वाधिक ४५ धावा केल्या. त्याला श्रेयस अय्यर आणि विराट कोहलीने चांगली साथ दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

श्रीलंकेने विजयासाठी दिलेल्या १४३ धावांचा पाठलाग करताना भारताने चांगली सुरुवात केली. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी केली. लोकेश राहुल माघारी परतल्यानंतर ठराविक अंतराने शिखर धवनही माघारी परतला. मात्र यानंत कर्णधार विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी फटकेबाजी करत भारताला विजयाच्या जवळ आणून ठेवलं. विजयासाठी ६ धावांची गरज असताना श्रेयस अय्यर माघारी परतला. यानंतर विराटने ऋषभ पंतच्या साथीने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

पहिला सामना पावसामुळे वाया गेल्यानंतर, भारतीय संघाने दुसऱ्या टी-२० सामन्यात दमदार पुनरागमन केलं. गोलंदाजांनी केलेल्या भन्नाट माऱ्यामुळे श्रीलंकेचा संघ २० षटकांत फक्त १४२ धावांपर्यंतच मजल मारु शकला. श्रीलंकेकडून कुसल परेराने ३४ धावा करत भारतीय गोलंदाजांना चांगली झुंज दिली.

लंकेच्या सलामीवीरांनी डावाची सुरुवात आश्वासक केली होती. अविष्का फर्नांडो आणि दनुष्का गुणतिलका यांनी पहिल्या विकेटसाठी ३८ धावांची भागीदारी केली. मात्र वॉशिंग्टन सुंदरने भारताला पहिलं यश मिळवून दिलं. यानंतर लंकेचे एक-एक फलंदाज माघारी परतत राहिले. कुसल परेराने भारतीय गोलंदाजांचा सामना करत झुंज देण्याचा प्रयत्न केला. त्याने २८ चेंडूत ३ षटकारांसह ३४ धावा केल्या. मात्र कुलदीप यादवने त्याला बाद केल्यानंतर लंकेचा डाव पुन्हा एकदा कोलमडला. भारताकडून शार्दुल ठाकूरने ३, नवदीप सैनी-कुलदीप यादवने प्रत्येकी २-२ तर जसप्रीत बुमराह आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी १-१ बळी घेतला.

Live Blog

Highlights

    22:14 (IST)07 Jan 2020
    षटकार ठोकत विराटकडून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब

    मालिकेत भारत १-० ने आघाडीवर

    22:06 (IST)07 Jan 2020
    भारताला तिसरा धक्का, श्रेयस अय्यर माघारी

    लहिरु कुमारने घेतला बळी

    21:41 (IST)07 Jan 2020
    शिखर धवन माघारी, भारताला दुसरा धक्का

    डिसिल्वाने घेतला बळी, भारताची विजयाच्या दिशेने सावध वाटचाल

    21:33 (IST)07 Jan 2020
    भारताला पहिला धक्का, लोकेश राहुल माघारी

    डिसिल्वाने उडवला राहुलचा त्रिफळा, ४५ धावा काढत राहुल बाद

    21:19 (IST)07 Jan 2020
    धवन-राहुल जोडीची आश्वासक सुरुवात

    पहिल्या विकेटसाठी केली अर्धशतकी भागीदारी

    20:32 (IST)07 Jan 2020
    एकाच षटकात शार्दुल ठाकूरचे श्रीलंकेला ३ दणके

    धनंजय डी-सिल्वा, इसुरु उदाना आणि लसिथ मलिंगाला धाडलं माघारी

    20:28 (IST)07 Jan 2020
    श्रीलंकेला सातवा धक्का

    शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर धनंजय डी-सिल्वा माघारी

    20:22 (IST)07 Jan 2020
    श्रीलंकेला सहावा धक्का

    दसून शनका माघारी, बुमराहने उडवला त्रिफळा

    20:15 (IST)07 Jan 2020
    श्रीलंकेचा निम्मा संघ माघारी, राजपक्षे बाद

    नवदीप सैनीच्या गोलंदाजीवर पंतने घेतला झेल

    20:07 (IST)07 Jan 2020
    मधल्या षटकांमध्ये भारताचं पुनरागमन, लंकेचे ४ फलंदाज माघारी

    ओशादा फर्नांडो कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर यष्टीचीत

    ठराविक अंतराने खेळपट्टीवर स्थिरावलेला परेराही माघारी, भारताचं दमदार पुनरागमन

    19:45 (IST)07 Jan 2020
    लंकन फलंदाजांची आश्वासक सुरुवात, मात्र दोन गडी माघारी

    नवदीप सैनीने उडवला गुणतिलकाचा त्रिफळा

    19:28 (IST)07 Jan 2020
    श्रीलंकेला पहिला धक्का, फर्नांडो माघारी

    वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर नवदीप सैनीने घेतला झेल

    पहिल्या विकेटसाठी लंकन सलामीवीरांची आश्वासक सुरुवात, मात्र वॉशिंग्टन सुंदरने अखेरीस जोडी फोडली

    19:04 (IST)07 Jan 2020
    भारताने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजीचा निर्णय

    नवीन वर्षाची सुरुवात विजयाने करण्याचं भारतीय संघासमोर आव्हान