Sri Lanka vs Bangladesh T20I Series: श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील सामनाही हाय व्होल्टेज होऊ लागला आहे. श्रीलंकेने शनिवारी ९ मार्चला बांगलादेशविरुद्धची टी-२० मालिका जिंकल्यानंतर श्रीलंकेच्या संघाने ट्रॉफीसह पोज देताना ‘टाइम-आउट’ सेलिब्रेशन केले. विश्वचषक २०२३ मध्ये श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यादरम्यान टाइमआउटचा वाद चर्चेत होता. बांग्लादेशच्या निर्णयामुळे श्रीलंकेचा खेळाडू अँजेलो मॅथ्यूज टाइम-आउटमुळे बाद होणारा पहिला खेळाडू ठरला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रीलंकेने मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना २८ धावांनी जिंकून मालिका २-१ अशी खिशात घातली आणि अनोख्या सेलिब्रेशनसह त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना डिवचले. श्रीलंकेने त्यांच्या इंस्टाग्रामवर ट्रॉफीसह एक फोटो पोस्ट केला, ज्यात सर्व खेळाडू त्यांच्या डाव्या हाताच्या मनगटाकडे इशारा करताना दिसले, जे काल्पनिक घड्याळ दर्शवते.

भारतातील विश्वचषक २०२३ दरम्यान टाइम-आउट संदर्भात दोन्ही संघांमध्ये वाद सुरू झाला होता, जेव्हा अँजेलो मॅथ्यूज वेळेवर मैदानावर न पोहोचल्यामुळे त्याला बाद करण्यात आले होते. आता श्रीलंकेने पुन्हा एकदा टाईम आऊट मुद्दयावरून बांग्लादेश संघाला डिवचलं आहे.

खेळाडूंनी ही पोज देताच श्रीलंकेच्या हजारो चाहत्यांनी एकत्र येऊन घोषणाबाजी सुरू केली. चाहत्यांनी खेळाडूंच्या समर्थनार्थ येऊन बांगलादेशला चिडवले. त्यामुळे सोशल मीडियावर पुन्हा वातावरण तापले. विश्वचषकानंतर या दोन्ही संघांमध्ये एकमेकांबद्दल अधिक कटुता निर्माण झाली आहे. विश्वचषकापूर्वीही जेव्हा जेव्हा श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात सामना व्हायचा तेव्हा तो असाच हाय व्होल्टेजचा होत असे.

श्रीलंका आणि बांग्लादेशमधील टी-२० मालिका

३ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील शेवटच्या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेच्या संघाला २० षटकांत ७ गडी गमावून १७४ धावा करता आल्या. कुसल मेंडिसने ५५ चेंडूत ८६ धावांची शानदार खेळी केली. यादरम्यान त्याने ६ चौकार आणि ६ षटकारही मारले. प्रत्युत्तरात फलंदाजीला आलेला बांगलादेशचा संघ अवघ्या १४६ धावांत सर्वबाद झाला आणि सामना २८ धावांनी गमावला. या विजयासह श्रीलंकेने ही मालिकाही २-१ ने जिंकली आहे.

नुवान तुषाराने आपल्या सनसनाटी गोलंदाजीवर हॅटट्रिक मिळवली. तुषाराने कौशल्य आणि अचूकतेच्या जोरावर ॉमहमुदुल्लाला LBW बाद करून आपली हॅटट्रिक साधली. तुषाराची हॅट्ट्रिक हा सामन्याला कलाटणी देणारा क्षण होता, ज्यामुळे बांगलादेशच्या पुनरागमनाच्या कोणत्याही आशा संपुष्टात आल्या. यजमानांच्या प्रयत्नांनंतरही, त्यांना या धक्क्यातून सावरता आले नाही आणि शेवटी श्रीलंकेने दिमाखदार विजय मिळवला.