श्रीलंकेचा जलदगती गोलंदाज आणि आपल्या यॉर्करने प्रतिस्पर्धी फलंदाजांची भंबेरी उडवणारा लसिथ मलिंगा पुन्हा एकदा चमकला आहे. शुक्रवारी पल्लकेलेच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध टी-२० सामन्यात मलिंगाने हॅटट्रीकची नोंद केली आहे. टी-२० क्रिकेटमधली मलिंगाची ही दुसरी हॅटट्रीक ठरली आहे. मलिंगाच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत ५ हॅटट्रीकची नोंद आहे.
Most Hat-tricks in International cricket:
5 by LASITH MALINGA (3 in ODIs and 2 in T20Is)
4 by Wasim Akram (2 in Tests and 2 in ODIs)#SLvNZ— Sampath Bandarupalli (@SampathStats) September 6, 2019
सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना श्रीलंकेने ८ गड्यांच्या मोबदल्यात १२५ धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या संघाला मलिंगाने चांगलाच दणका दिला. कॉलिन मुनरो, हमीश रुदरफोर्ड, कॉलिन डी-ग्रँडहोम आणि रॉस टेलर यांना तिसऱ्या षटकात लागोपाठच्या चेंडूवर बाद करत मलिंगाने हॅटट्रीक नोंदवली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४ चेंडूत ४ बळी घेण्याची मलिंगाची ही दुसरी वेळ ठरली आहे. याआधी २००७ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन-डे सामन्यात त्याने अशी कामगिरी करुन दाखवली होती.
4 wickets in 4 balls in an International game:
Lasith Malinga vs SA, 2007 (ODI)
Rashid Khan vs IRE, 2019 (T20I)
LASITH MALINGA vs NZ, Today (T20I)#SLvNZ— Sampath Bandarupalli (@SampathStats) September 6, 2019
चार फलंदाजांना माघारी पाठवल्यानंतर मलिंगाने पाचव्या षटकात टीम सेफेर्टलाही माघारी धाडत न्यूझीलंडला पाचवा धक्का दिला. पहिल्या ३ षटकांच्या स्पेलमध्ये मलिंगाने एक षटक निर्धाव टाकत ५ धावा देत निम्मा संघ गारद केला.