श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघाला टी-२० मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले. भारताने तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकल्यानंतर श्रीलंकेने पुनरागमन केले आणि पुढील दोन सामने जिंकून मालिका जिंकली. २००८ नंतर श्रीलंकेच्या संघाने भारताविरुद्ध द्विपक्षीय मालिकेत विजय मिळवण्याची ही पहिलीच वेळ होती. या विजयाने खूश झालेल्या श्रीलंका क्रिकेट बोर्डाने संघाला १० हजार डॉलर्स म्हणजेच ७४ लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.
श्रीलंकेच्या संघाने उत्कृष्ट खेळ दाखवून भारताविरुद्ध घरची मालिका जिंकली. वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय संघ श्रीलंकेत पोहोचला. भारतीय संघाचे कर्णधारपद अनुभवी शिखर धवनकडे सोपवण्यात आले, तर राहुल द्रविडला मुख्य प्रशिक्षक म्हणून या दौऱ्यावर पाठवण्यात आले. संघात अनेक नवीन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आणि शेवटच्या दोन सामन्यांमध्ये युवा संघाला मैदानात उतरवण्यात आले.
Sri Lanka Cricket recognizes the National Team for winning the T20I Series.
The Executive Committee of Sri Lanka Cricket decided to award a sum of US$ 100,000 for the National team. READ https://t.co/ZDgGfe53OR
— Sri Lanka Cricket (@OfficialSLC) July 30, 2021
हेही वाचा – टीम इंडियाला हरवल्यानंतर श्रीलंकेच्या क्रिकेटपटूनं घेतली निवृत्ती!
टी-२० मालिकेत श्रीलंका संघाने पहिल्या सामन्यात ३८ धावांनी पराभव स्वीकारल्यानंतर पुनरागमन केले. अनुभवाची कमतरता असलेल्या खेळाडूंसह उतरलेल्या भारताला श्रीलंकेने दुसऱ्या टी-२० सामन्यामध्ये पराभूत केले तर तिसरा सामना एकतर्फी जिंकला. या मालिकेतील संघाच्या कामगिरीने बोर्ड खूप आनंदी आहे.