Team India’s advantage in ICC ODI rankings: पाकिस्तानला कोलंबोमध्ये श्रीलंकेविरुद्ध २ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह पाकिस्तानी संघ आशियाई चषक २०२३ मधून बाहेर पडला. या विजयासह श्रीलंकेने अंतिम फेरीत स्थान पक्के केले आहे. पराभवासोबतच पाकिस्तानला आणखी एक पराभव झाला आहे. वनडे क्रमवारीत त्यांची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. यासोबतच टीम इंडियाने दुसऱ्या क्रमांकावर मजल मारली आहे.

आशिया चषकापूर्वी पाकिस्तान होता पहिल्या क्रमांकावर –

आशिया चषक सुरू होण्यापूर्वी पाकिस्तान आयसीसीच्या क्रमवारीत एकदिवसीय संघात नंबर वन होता. याचा दाखला देत पाकिस्तानी दिग्गज आपल्या संघाला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणत होते. आशिया चषकाचा प्रवास संपेपर्यंत पाकिस्तान संघ क्रमवारीत भारतापेक्षा मागे पडला आहे. पाकिस्तानच्या पराभवाचा भारताला क्रमवारीत मोठा फायदा झाला आहे.

Champions Trophy 2025 Updates ECB Came in Support of PCB
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ‘या’ देशाचा पाकिस्तानला पाठिंबा, BCCI शी पंगा घेणं पडू शकतं महागात
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
KL Rahul returns to nets after injury scare ahead BGT
KL Rahul : टीम इंडियासाठी आनंदाची बातमी! पर्थ कसोटी सामन्यापूर्वी ‘हा’ स्टार खेळाडू दुखापतीतून सावरला
India vs South Africa 4th T20 Live Updates in Marathi
IND vs SA: भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विक्रमी १३५ धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी अन्य देशात हलवल्यास पाकिस्तान बोर्डाला कोट्यवधींचा फटका; कसा ते जाणून घ्या
Team India Performance in Border Gavaskar Trophy played at Australia
Team India : टीम इंडियाची ऑस्ट्रेलियामध्ये कामगिरी खूपच निराशाजनक, तब्बल ‘इतक्या’ वेळा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत पत्करावा लागलाय पराभव
Mumbai Indians will buy five of their old players for IPL 2025
Mumbai Indians : मुंबई इंडियन्स विक्रमी सहाव्यांदा जेतेपद पटकावण्यासाठी ‘या’ पाच जुन्या शिलेदारांवर लावणार बोली, जाणून घ्या कोण आहेत?

ताज्या आयसीसी वनडे क्रमवारीत पाकिस्तान संघ तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. त्याचे ३१०२ गुण आहेत. तसेत ११५ रेटिंग पॉइंट आहेत. टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर आहे. भारताचे ४५१६ गुण आणि ११६ रेटिंग पॉइंट आहेत. ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचे ३०६१ गुण आणि ११८ रेटिंग पॉइंट आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंडचे संघही पहिल्या पाचमध्ये आहेत. इंग्लंडचा संघ चौथ्या आणि न्यूझीलंडचा संघ पाचव्या स्थानावर आहे.

हेही वाचा – PAK vs SL: पाकिस्तानचा पत्ता कट! फायनल भारत वि. श्रीलंका

श्रीलंकेने पाकिस्तानला आशिया कपमधून केले बाहेर –

यष्टिरक्षक मोहम्मद रिझवान आणि सलामीवीर अब्दुल्ला शफीक यांच्या अर्धशतकांच्या जोरावर पाकिस्तानने, गुरुवारी आशिया चषक सुपर फोर टप्प्यातील पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात सात विकेट गमावून २५२ धावा केल्या. पाकिस्तानच्या २५२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने शेवटच्या चेंडूवर आठ बाद २५२ अशी मजल मारली. मेंडिसने ८७ चेंडूंत आठ चौकार आणि एका षटकारासह केलेल्या ९१ धावा आणि समरविक्रम (४८) सोबत तिसऱ्या विकेटसाठी केलेल्या १०० धावांच्या भागीदारीमुळे श्रीलंकेने विजय मिळवला. श्रीलंकेने गेल्या वर्षी टी-२० फॉरमॅटमध्ये खेळलेली ही स्पर्धा जिंकली होती.