श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू दिलहारा लोकुहेतिगे यांला आठ वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. आयसीसी नियमांचं उल्लंघन आणि दोषी आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. माजी वेगवान गोलंदाज दिलहारा लोकुहेतिगे यानं आयसीसी भ्रष्टाचार विरोधी संहितेतील तीन नियमांचं उल्लंघन केल्याचं स्पष्ट झाल आहे. आयसीसीने चौकशी पूर्ण केल्यानंतर क्रिकेटमधील सर्व प्रकारातून त्याचं निलंबन करण्याचा निर्णय दिला आहे. लोकुहेतिगेवर नोव्हेंबर २०१९ मध्ये संयुक्त अरब अमीरात येथे झालेल्या स्पर्धेत आणि २०१७ साली टी २० स्पर्धेदरम्यान मॅच फिक्सिंगचे आरोप लागले होते.
एखाद्या पक्षावर प्रभाव टाकणे, खेळाडू आणि खेळावर थेट प्रभाव पाडणे असे आरोप लोकुहेतिगेवर होते. आयसीसी नियमातील अनुच्छेद २.१.१, २.१.४ आणि २.४.४ अंतर्गत दोषी असल्याचं स्पष्ट झालं आहे. दिलहारावर बंदी ३ एप्रिल २०१९ पासून लागू असणार आहे. यापूर्वीच दिलहाराला निलंबित करण्यात आलं आहे.
डिव्हिलियर्स खेळणार यंदाचा टी-20 वर्ल्डकप?
दिलहारा लोकुहेतिगे यानं २००५ साली श्रीलंकन संघात पदार्पण केलं होतं. त्याने श्रीलंकेकडून ९ एकदिवसीय आणि दोन टी २० आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. २००८ साली तो संघासाठी पहिला आंतरराष्ट्रीय टी २० सामना खेळला होता. त्याने एकूण ८ गडी आणि १०१ धावा केल्या आहेत.