सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचा अवमान करत बीसीसीआयच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवल्याप्रकरणी बीसीसीआयचे पायउतार अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली. ८ फेब्रुवारीला झालेल्या बैठकीला श्रीनिवासन अध्यक्षस्थानी होते. या वेळी वार्षिक सर्वसाधारण बैठक २ मार्चला होणार असल्याचे निश्चित झाले होते.
न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. त्या वेळी श्रीनिवासन यांनी माफी मागितली. तसेच न्यायालयाने श्रीनिवासन यांना बीसीसीआयच्या बैठकीत तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहून मतदान करण्यास अनुमती दिली.
२ मार्च रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत तसेच बीसीसीआयच्या कोणत्याही बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवणार नाही, असे प्रतिज्ञापत्र श्रीनिवासन यांनी सादर केले. श्रीनिवासन यांच्या वतीने कपिल सिब्बल यांनी न्यायमूर्ती टी. एस. ठाकूर आणि एफ. एम. आय. कालीफुला यांच्या खंडपीठापुढे माफीनामा आणि प्रतिज्ञापत्र सादर केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा