विविध वादग्रस्त कारणांमुळे बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागलेल्या एन. श्रीनिवासन यांनीच बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. या बैठकीतच आयपीएल स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळलेल्या खेळाडूंवर बंदीचा निर्णय घेण्यात आला. श्रीनिवासन यांनी बोर्डाच्या दैनंदिन कामकाजापासून स्वत:ला दूर ठेवले आहे. मात्र स्पॉट-फिक्सिंगसारखी प्रकरणे अपवादात्मक असतात. त्यामुळे श्रीनिवासन यांनी बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. त्यामुळे बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवल्याप्रकरणी श्रीनिवासन यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याचा ठपका ठेवता येणार नाही. जगमोहन दालमिया यांना कोणत्याही कागदावर सह्या करण्याचे अधिकार नाहीत, हे सत्य आहे. त्याचबरोबर शिस्तपालन समिती अध्यक्षांच्या अनुपस्थितीत कोणताही निर्णय जाहीर करू शकत नाही, त्यामुळे श्रीनिवासन यांची उपस्थिती गरजेची होती, असे बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा