सट्टेबाजी प्रकरणात जावई गुरुनाथ मय्यपनच्या अटकेनंतर बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन यांच्या अडचणी अधिकच वाढल्या आहेत. श्रीनिवासन यांचा खासगी सचिव आणि भाचा सुंदररमन याचे विंदूशी संभाषण झाल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. अद्याप सुंदररमनचा सट्टेबाजी किंवा मॅच फिक्सिंगशी सहभाग असल्याचे सिद्ध झालेले नसले तरी त्याचा विंदूशी असलेला संपर्क संशय निर्माण करणारा आहे.
एप्रिल महिन्यात गुरुनाथ मय्यपनला आयसीसीच्या एका अधिकाऱ्याने सावध केले होते. तरीसुद्धा मय्यपन हा बिधास्तपणे सट्टेबाजी करीतच होता. सट्टेबाजीप्रकरणी आपल्याभोवती फास आवळला जाणार नाही याची मय्यपनला खात्री होती. मुंबई पोलिसांच्या चौकशीत शनिवारी नवीन माहिती उजेडात आली. श्रीनिवासन यांचा भाचा सुंदररमन आयपीएल सामन्यादरम्यान पाच वेळा विंदूशी बोलला होता. विंदू हा सर्वाच्या संपर्कात होता. पण नेमके सामन्यादरम्यान त्याचे आणि सुंदररमनशी झालेले संभाषण संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

Story img Loader