* जगमोहन दालमिया बीसीसीआयचे अंतरिम अध्यक्ष

बीसीसीआय पदाधिकाऱ्यांच्या चेन्नई येथील झालेल्या तातडीच्या बैठकीत अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांच्या अध्यक्षपदाची सुत्रे आता बीसीसीआयचे माजी अध्यक्ष जगमोहन दालमियांकडे सोपविण्यात आल्याचे सुत्रांनी दिेलेल्या माहितीतून समजते. मात्र, श्रीनिवासन यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही. आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणा छडा लागेपर्यंत जगमोहन दालमियांना अंतरिम अध्यक्षपद देण्यात आल्याची माहिती पीटीआयने दिली आहे.  अंतरिम अध्यक्षपदासाठी अरुण जेटली यांनी जगमोहन दालमियांचे नाव सुचविले व त्यावर इतर पदाधिकाऱ्यांनीही होकार दर्शवला. त्यानुसार जगमोहन दालमिया आता बीसीसीआयचे अंतरिम अध्यक्षपद सांभाळतील.

आयपीएल स्पॉट फिक्सिंगच्या प्रकरणावरून बीसीसीआयचे अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांच्यावर राजीनाम्याचा दबाव दिवसेंदिवस वाढत चालला होता. या पार्श्वभूमीवर चेन्नई येथे बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेण्यात आली होती.

Story img Loader