‘‘जावई गुरुनाथ मयप्पन याच्या स्पॉट-फिक्सिंगमधील कथित सहभागाच्या आरोपांमुळे बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी राजीनामा द्यावा की नाही हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याबाबत बोलण्यास मी योग्य व्यक्ती नाही,’’ असे केंद्रीयमंत्री शरद पवार यांनी सांगितले. श्रीनिवासन यांचे भवितव्य बीसीसीआयच्या हाती असल्याचेही यावेळी त्यांनी सूचित केले.
‘‘माझ्या कार्यकाळात मला सहकाऱ्यांची चांगली साथ लाभली. त्यांच्या पाठिंब्यामुळेच माझ्या कार्यकाळात काही चांगल्या गोष्टी घडून आल्याचे त्यांनी सांगितले. आयपीएलच्या सहाव्या हंगामातील सर्व सामन्यांची गृहमंत्रालयातर्फे चौकशी व्हावी, ही शशांक मनोहर यांची मागणी योग्य आहे,’’ असेही पवार यावेळी म्हणाले.
‘‘आमचा लाचलुचपत विरोधी विभाग हे काम करेल, अशी जर बीसीसीआयची धारणा असेल, तर या चुकीच्या गोष्टींसंदर्भात ते गंभीर नाहीत, अशी माझी भावना आहे,’’ असे पवार म्हणाले. ते पुढे म्हणाले, ‘‘स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणमुळे क्रिकेटरसिकांच्या भावनांना तडा गेला आहे.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा