काही दिवसांपूर्वी एका अव्वल भारतीय महिला सायकलपटूने राष्ट्रीय प्रशिक्षक आरके शर्मा यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप लावले होते. त्यानंतर, भारतीय क्रीडा क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. आरके शर्मांच्या अचडणींमध्ये आता आणखी वाढ होताना दिसत आहे. आता एका महिला सायकलपटूनेदेखील शर्मांच्याविरोधात तक्रार केली आहे. ‘प्रशिक्षक शर्मांनी आपल्याला दोनदा तिला मारहाण केली होती. एवढेच नाही तर मी समलैंगिक असल्याचा आरोपही केला होता’, असे या सायकलपटूने सांगितले आहे.

सध्याची राष्ट्रीय चॅम्पियन आणि आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेती डेबोरा हेरोल्डने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘तिला जाणीवपूर्वक राष्ट्रीय संघातून वगळण्यात आले होते. कारण, आरके शर्मा आणि त्यांची सहाय्यक गौतमणी देवी यांना डेबोरा समलैंगिक नात्यामध्ये असल्याचा संशय होता.’ डेबोराशिवाय आणखी दोन सायकलपटूंनी देखील इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, त्यांनी भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या ‘अंतर्गत तक्रार’ समितीकडे आरके शर्मा आणि गौतमणी देवीविरोधा तक्रार दाखल केली आहे. ते दोघे महिला खेळाडूंना सतत धमकावत आहेत. त्यामुळे खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम होत आहे.

Sanju Samson honored by Congress Leader Shashi Tharoor in Thiruvananthapuram
IND vs BAN : शतकवीर संजू सॅमसनचे तिरुअनंतपुरममध्ये जंगी स्वागत, शशी थरुर यांनी पारंपारिक ‘पोनाडा’ शाल देऊन केला गौरव
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Raj Thackeray
Raj Thackeray : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “गेली ९९ वर्ष संघाने…”
Provocative slogans, Rashtriya Swayamsevak Sangh parade, RSS parade, Ratnagiri, RSS parade Ratnagiri,
रत्नागिरी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलनप्रसंगी प्रक्षोभक घोषणा: चौघाजणांविरुद्ध गुन्हा दाखल
Maharashtra dominates archery, archery,
तिरंदाजीत आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचा दबदबा, युवा आशियाई स्पर्धेत ९ खेळाडूंना पदकाची कमाई, पदक विजेत्यांत पुण्याचे दोन खेळाडू
congress mp praniti shinde alleged plastic mixed rice distributed to ration card holders
प्लास्टिक तांदूळ खाण्यास मारक की पोषक? खासदार प्रणिती शिंदे यांच्या आरोपाने वाद; प्रशासनाचा अनुकूल दावा
Raj Thackeray meets child in Train
Raj Thackeray : राज ठाकरेंना ट्रेनमध्ये पाहून चिमुकला म्हणाला, “जय महाराष्ट्र”, त्यानंतर काय घडलं? व्हिडीओ व्हायरल
Rohit Sharma Statement on International Retirement
Rohit Sharma: “मी टी-२० मधून निवृत्ती घेण्यामागचं एकमेव कारण म्हणजे…”, रोहित शर्माने सांगितला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा प्लॅन, पाहा VIDEO

हेही वाचा – VIDEO : ‘पंतसेने’चे राजकोटमध्ये आगमन तर, कसोटी संघाचे इंग्लंडसाठी उड्डाण

डेबोरा हेरोल्ड २०१२ पासून भारतीय सायकलपटू संघाचा भाग आहे. ती २०१४ पासून आरके शर्मा यांच्याकडून प्रशिक्षण घेत आहे. तिने दिलेल्या माहितीनुसार, २०० मीटर स्प्रिंट आणि ५०० ​​मीटर टाइम ट्रायल इव्हेंटमध्ये देशातील सर्वात वेगवान सायकलपटू असूनही २०१८ ते २०१९ च्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत तिला संघाबाहेर ठेवण्यात आले होते. डेबोरा म्हणाली, “गौतमणी देवीला वाटले की मी एका सहकारी महिला सायकलपटूसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. त्यांनी मला खूप त्रास दिला. माझ्याकडे दुर्लक्ष केले आणि बाकीच्या सायकलपटूंपासून मला वेगळे केले. शेवटी, मला राष्ट्रीय शिबिरातूनही बाहेर काढण्यात आले. पण, प्रत्यक्षात मी समलैंगिक नाही…. आमची फक्त चांगली मैत्री आहे.”

हेही वाचा – Ranji Trophy Semi Finals : कधीकाळी आईने क्रिकेट खेळण्यास नाकारली होती परवानगी, आज तोच खेळाडू ठरला मुंबईसाठी तारणहार

‘आरके शर्माने आपल्याला प्रशिक्षणानंतर मसाज देऊन एकाच खोलीत राहण्यास भाग पाडले. मला जबरदस्तीने स्वत:कडे ओढण्याचा प्रयत्न केला. मे महिन्यात स्लोव्हेनियातील एका शिबिरात त्याच्यासोबत झोपण्यासही सांगितले’, असे आरोप काही दिवसांपूर्वी एका आघाडीच्या सायकलपटूने केले होते. याबाबत तिने भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडे (एसएआय) शर्माच्या विरोधात लैंगिक छळाची तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर डेबोरानेदेखील छळ झाल्याचे आरोप केले आहेत.

या आरोपांबद्दल विचारले असता, गौतमणी देवी यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने (सीएफआय) जे करण्यास सांगितले होते तेच आपण केले. तर, आरके शर्मा यांनी याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.