पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नवजात मुलाचे निधन झाले आहे. रोनाल्डोने १८ एप्रिल रोजी रात्री उशिरा ट्विट करून ही माहिती दिली आहे. रोनाल्डो आणि त्याची पत्नी जॉर्जिना यांनी संयुक्त निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे. रोनाल्डोची पत्नी जॉर्जिना रॉड्रिग्जने सोमवारी जुळ्या मुलांना जन्म दिला, मात्र प्रसूतीदरम्यान तिच्या नवजात मुलाचा मृत्यू झाला. रोनाल्डो आणि त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, ज्याची माहिती खुद्द ख्रिस्तियानो रोनाल्डोने सोशल मीडियावर दिली आहे.

“आमच्या नवजात मुलाचे निधन झाल्याचे अत्यंत दुःखाने कळवावे लागत आहे. कोणत्याही पालकांसाठी हे सर्वात मोठे दु:ख आहे. केवळ आपल्या नवजात मुलीचा जन्म आपल्याला हा क्षण काहीशा आशा आणि आनंदाने जगण्याचे बळ देत आहे. आम्हाला पाठिंबा देणाऱ्या सर्व डॉक्टर्स आणि परिचारिकांचे आम्ही आभार मानतो. या संपूर्ण घटनेने आम्ही निराश झालो असून प्रत्येकाने गोपनीयतेची काळजी घ्यावी. आमचा मुलगा आमचा देवदूत होता, आम्ही त्याच्यावर कायम प्रेम करू,” असे ख्रिस्तियानो रोनाल्डोने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Girl stops talking to family at boyfriend behest Nagpur news
प्रेमासाठी वाट्टेल ते ! प्रियकराच्या सांगण्यावरुन मुलीचा कुटुंबियांशी अबोला
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Sane Guruji , book Sane Guruji Jeevan Gatha,
‘साने गुरुजींची जीवनगाथा’ आता ‘श्रवणीय’
Son gifted father Mercedes on his 65th birthday emotional video goes viral on social media
VIDEO: “आयुष्यात फक्त एवढं यशस्वी व्हा” मुलानं वडिलांच्या ६५व्या वाढदिवसाला गिफ्ट केली मर्सिडीज कार; वडिलांची रिअ‍ॅक्शन पाहाच
Gashmeer Mahajani
“…तरच मूल होऊ द्या”, पालकत्वाविषयी स्पष्टच बोलला गश्मीर महाजनी; म्हणाला, “तुम्ही आई-वडील म्हणून कैद…”
a student expressed about life after his father death
“अपघातात वडील वारले अन्…” चिमुकल्याने सांगितली व्यथा; विद्यार्थ्यांसह शिक्षकही रडले, पाहा VIRAL VIDEO
Ashwini Kalsekar On Not Having Kids
“तेव्हा सरोगसीची फॅशन नव्हती अन् पैसेही नव्हते…”, मूल नसण्याबाबत मराठमोळ्या अश्विनी काळसेकर यांचे वक्तव्य
Milind Gawali
“तुम्ही कायम माझे हिरो”, वडिलांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त मिलिंद गवळींची खास पोस्ट; म्हणाले, “पोलीस खात्यातून Retire…”

रोनाल्डो आणि त्याची जोडीदार जॉर्जिना यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये जाहीर केले होते की ते जुळ्या मुलांचे पालक होणार आहेत. दोघांनीही हॉस्पिटलमधील फोटो शेअर केला होता. त्यांची नवजात मुलगी सुखरूप आहे.

दरम्यान, रोनाल्डोला आधीच दोन मुले आणि दोन मुली आहेत. २०१० मध्ये, ते प्रथमच क्रिस्टियानो जूनियरचा पिता झाला., तो त्याच्या पहिल्या मुलाच्या आईची ओळख उघड करू इच्छित नाही. त्यासाठी त्यांने करारही केला होता. ९ जून २०१७ रोजी रोनाल्डो जुळ्या मुलांचा बाप झाला. मुलगी इवा आणि मुलगा माटेओ यांचा जन्म सरोगसीद्वारे झाला. त्यानंतर, १२ नोव्हेंबर २०१७ रोजी, रोनाल्डोची जोडीदार जॉर्जिना हिने मुलगी आलियाना मार्टिनाला जन्म दिला.

Story img Loader