Star Sports Announces Hindi and English Commentary Panel for IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामाला सुरुवात होण्यासाठी आता एका आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. स्पर्धेच्या सतराव्या हंगामाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. याआधी अधिकृत प्रसारक स्टार स्पोर्ट्सने कॉमेंट्री पॅनलची घोषणा केली आहे. त्यात सुनील गावसकर, हरभजन सिंग अशा अनेक दिग्गजांच्या नावांचा समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसभा निवडणुकीमुळे बीसीसीआयने नुकतेच २१ सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. दरम्यान, कॉमेंट्री पॅनलही जाहीर करण्यात आले असून त्यात इंग्रजी आणि हिंदी कॉमेंट्रीची जबाबदारी वेगवेगळ्या दिग्गजांवर सोपवण्यात आली आहे. या यादीत भारतीय खेळाडूंशिवाय विदेशी दिग्गजांचीही नावे आहेत.

हिंदी कॉमेंट्री पॅनलमध्ये कोणकोणाचा समावेश?

बीसीसीआयने हरभजन सिंग, इरफान पठाण, सुनील गावसकर, रवी शास्त्री, इम्रान ताहिर, अंबाती रायुडू, वरुण आरोन, मिताली राज, मोहम्मद कैफ, संजय मांजरेकर, वसीम जाफर, गुरकीरत मान, उन्मुक्त चंद, जतिन सप्रू, दीप दासगुप्ता, रजत भाटिया, विवेक राजदान आणि रमन पद्मजीत यांचा हिंदी कॉमेंट्री पॅनलमध्ये समावेश केला आहे. मिताली राज ही एकमेव महिला क्रिकेटपटू आहे, जिचा समावेश हिंदी कॉमेंट्री पॅनलमध्ये आहे. यासोबतच पंजाब किंग्जपासून नुकतेच वेगळे झालेल्या वसीम जाफरचेही नाव या यादीत समाविष्ट झाले आहे.

हेही वाचा – सुनील गावसकरांनी BCCIला दिली भन्नाट आयडिया; म्हणाले, ‘रणजी ट्रॉफी सामन्याची फी दुप्पट किंवा तिप्पट करा…’

इंग्रजी कॉमेंट्री पॅनलमध्ये कोणाकोणाचा समावेश?

इंग्रजी कॉमेंट्री पॅनलमध्ये स्टीव्ह स्मिथ, स्टुअर्ट ब्रॉड, स्टेन, जॅक कॅलिस, टॉम मूडी, पॉल कॉलिंगवूड, सुनील गावसकर, ब्रायन लारा, रवी शास्त्री, मॅथ्यू हेडन, केविन पीटरसन, मायकेल क्लार्क, संजय मांजरेकर, आरोन फिंच, इयान बिशप, निक नाइट, सायमन कॅटिच, डॅनी मॉरिसन, क्रिस मॉरिस, सॅम्युल बद्री, केटी मार्टीन, ग्रॅमी स्वान, दीप दासगुप्ता, हर्षा भोगले, मबांगवा, अंजुम चोप्रा, मुरली कार्तिक, डब्ल्यू व्ही रमण, रोहन गावसकर, डॅरेन गंगा, मार्क हॉवर्ड आणि जर्मनोस यांची निवड करण्यात आली आहे. हिंदीशिवाय गावस्कर, शास्त्री आणि दीप दासगुप्ता इंग्रजीतही योगदान देताना दिसणार आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Star sports announces hindi and english commentary panel for ipl 2024 sunil gavaskar ravi shastri see list vbm