नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) प्रशासकीय समितीच्या शुक्रवारी होणाऱ्या बैठकीमध्ये राज्य क्रिकेट संघटनांच्या निवडणुका आणि माजी सलामीवीर विक्रम राठोड यांचा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या फलंदाजीच्या सल्लागारपदासाठी आलेल्या अर्जाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. राज्यातील निवडणुकांसाठी निवडणूक अधिकारी नेमण्याची मुदत संपली आहे. आधी या नियुक्तीसाठी १ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती, परंतु नंतर ती २५ जुलैपर्यंत वाढण्यात आली. प्रशासकीय समितीने राज्य संघटनांना पत्र लिहून लोढा समितीच्या शिफारशींनुसार घटनांमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत. ही सुधारणा न झाल्यास २२ ऑक्टोबरला होणाऱ्या ‘बीसीसीआय’च्या निवडणुकीत मतदानाचा हक्क गमावला जाईल, असा इशारा दिला आहे.

Story img Loader