क्रीडा संस्कृतीच्या अभावाचे भारतातील आणखी एक धक्कादायक उदाहरण समोर आले आहे. उत्तर प्रदेशातील माजी राज्यस्तरीय बॉक्सिंगपटूवर कचरा कामगार होण्याची वेळ ओढवली आहे. नव्वदीच्या दशकात जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत तीन सुवर्णपदके पटकावणाऱ्या कमल कुमार वाल्मीकी यांची ही कहाणी आहे. फावल्या वेळात ते रिक्षा चालवण्याचे काम करतात.
‘‘उत्तर प्रदेश राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत मी कांस्यपदक पटकावले होते. मात्र रागावर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरल्याने मागे पडलो. मला प्रशिक्षक व्हायचे होते, मात्र बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे होऊ शकलो नाही. त्यामुळे कुटुंबाला आर्थिक हातभार लागेल अशी कामे करू लागलो,’’ असे वाल्मीकी यांनी सांगितले.
‘‘मला चार मुले असून, दोघांनी तरी बॉक्सिंगची आवड जोपासावी. जेणेकरून बॉक्सिंगमधील अपुऱ्या आशाआकांक्षा ते पूर्ण करू शकतील. सरकारने मला छोटय़ा स्वरूपाचे कर्ज द्यावे, त्यायोगे मी माझा व्यवसाय करू शकेन. कुटुंब चालवण्यासाठी ते आवश्यक आहे,’’ असे वाल्मीकी यांनी सांगितले.

Story img Loader