सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर सोमवारपासून सुरू होणाऱ्या महापौर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत मुंबई, ठाणे, उस्मानाबाद, पुणे आदी ठिकाणचे २१ नामवंत संघ सहभागी होणार आहेत.
महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने होणाऱ्या या स्पर्धेतील पुरुष गटातील १२ संघांची चार गटांत विभागणी करण्यात आली आहे. महिला गटातील ९ संघांची तीन गटांत विभागणी झाली आहे. स्पर्धेतील सामने प्रथम साखळी व नंतर बाद पद्धतीने होणार आहेत. त्यामध्ये मुंबई, ठाणे, नाशिक, उस्मानाबाद, सातारा, अहमदनगर, रत्नागिरी, पुणे येथील अव्वल दर्जाचे संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेत युवराज जाधव, नरेश सावंत, मयुरेश साळुंके, प्रतीक वाईकर, स्वप्नील चिकणे, दीपेश मोरे, प्रियंका येळे, सुप्रिया गाढवे, गौरी शेलार आदी नामवंत खेळाडूंचे कौशल्य पाहण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेसाठी दोन क्रीडांगणे तयार करण्यात आली आहेत. दोन हजार प्रेक्षक बसू शकतील एवढी गॅलरी उभारण्यात आली आहे.
राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा आजपासून
सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर सोमवारपासून सुरू होणाऱ्या महापौर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत मुंबई, ठाणे, उस्मानाबाद, पुणे आदी ठिकाणचे २१ नामवंत संघ सहभागी होणार आहेत.
First published on: 21-12-2014 at 07:30 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State level kho kho competition from today