भारतीय शरीरसौष्ठव महासंघाच्या मान्यतेने शनिवारी ‘महापौर श्री’ राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा अरुणकुमार वैद्य स्टेडियमवर महापौर वैशाली बनकर यांच्या हस्ते सायंकाळी ५ वाजता सुरू होणार आहे.
स्पर्धेकरिता ५५, ६०, ६५, ७०, ७५, ८० किलोखालील व ८० किलोवरील असे गट ठेवण्यात आले आहेत.
प्रत्येक गटात पहिले पाच क्रमांक मिळविणाऱ्या खेळाडूंना अनुक्रमे १० हजार, ८ हजार, ६ हजार, ४ हजार व २ हजार रुपये अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.
‘महापौर-श्री’ किताब मिळविणाऱ्या खेळाडूस ५१ हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. स्पर्धेत २५ जिल्ह्य़ांमधील
दोनशेहून अधिक खेळाडूंनी भाग घेतला आहे.
आज पुण्यात राज्यस्तरीय ‘महापौर-श्री’ स्पर्धा
भारतीय शरीरसौष्ठव महासंघाच्या मान्यतेने शनिवारी ‘महापौर श्री’ राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे.
First published on: 16-03-2013 at 04:29 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State level mahapour shree competition in pune today