सचिन तेंडुलकरपेक्षा ब्रायन लाराच चांगला फलंदाज असल्याचे वक्तव्य ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग याने केले होते. यावेळी त्याने लाराने सचिनपेक्षा जास्त सामने संघाला जिंकवून दिले आहेत, अशी टिप्पणीही केली होती. पण आकडेवारी पाहिल्यावर मात्र पॉन्टिंगचे विधान निखालस खोटे असल्याचे सर्वापुढे आले आहे, कारण आकडेवारीनुसार सचिनने लारापेक्षा जास्त सामने संघाला जिंकवून दिले असल्याचे स्पष्ट झाले आहे. माझ्यासाठी सचिन आणि लारा हे दोन्ही महान  फलंदाज आहेत. माझ्या मते लाराने संघाला सचिनपेक्षा जास्त सामने जिंकवून दिले आहेत. ब्रायन लारा जर फलंदाजीला येणार असेल त्या दिवशीच्या पूर्वी मला झोप लागायची नाही. पण सचिनबाबत तसे झाले नाही, असे पॉन्टिंग म्हणाला होता.

Story img Loader