Steve Smith and Nathan Lyon made big statements about Virat Kohli: विराट कोहली नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल २०२३ मध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसला होता. आता ७ जूनपासून (आज) ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही चाहत्यांना कोहलीकडून आयपीएलमधील फॉर्मची अपेक्षा आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर होणार आहे. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथ आणि फिरकीपटू नॅथन लायन यांनी कोहलीवर मोठे वक्तव्य केले आहे.
नॅथन लायन –
ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायन विराट कोहलीबद्दल म्हणाला की, जेव्हा तुम्ही त्याच्याविरुद्ध खेळता तेव्हा असं वाटतं की संपूर्ण देश तुमच्या विरोधात आहे. स्टार स्पोर्ट्सवर बोलताना नॅथन लियॉन म्हणाला, “जेव्हा तुम्ही विराट कोहलीविरुद्ध खेळता तेव्हा असं वाटतं की संपूर्ण देश तुमच्या विरोधात आहे. तो सुपरस्टार आहे.
स्टीव्ह स्मिथ –
स्मिथने कोहलीचे जोरदार कौतुक केले. तो म्हणाला की कोहली एक फलंदाज म्हणून दीर्घकाळ उत्कृष्ट आहे. स्टार स्पोर्ट्सवर बोलताना स्मिथ म्हणाला, “तो गेल्या काही वर्षांपासून एक उत्कृष्ट फलंदाज आहे. जगातील सर्वोत्तमांपैकी एक.”
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या डावात १८६ धावा केल्या होत्या –
यावर्षी (२०२३) फेब्रुवारी-मार्चमध्ये खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या सामन्यात कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार खेळी केली. बॉर्डर-गावसकर मालिकेतील शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला, ज्यात त्याने पहिल्या डावात १८६ धावा केल्या होत्या.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यांत विराट कोहलीची कामगिरी –
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यांमध्ये कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४२ डाव खेळले असून त्यात त्याने ४८.३ च्या सरासरीने १९७९ धावा केल्या आहेत. यादरम्यान, त्याने ८ शतके आणि ५ अर्धशतके झळकावली आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या १८६ आहे. कोहली ४२ डावांत एकदा नाबाद राहिला आहे.
हेही वाचा – WTC फायनलआधी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची मोठी घोषणा, म्हणाला, “कर्णधारपद सोडण्याआधी…”
डब्ल्यूटीसी फायनलसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, इशान किशन (विकेटकीपर).