Steve Smith becomes 17th Australian batsman to reach 5000 runs: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना राजकोटमध्ये खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी ऑस्ट्रेलियाला दमदार सुरुवात करून दिली. वॉर्नर ५६ धावांची इनिंग खेळून बाद झाला. त्यानंतर मार्शचे अवघ्या ४ धावांनी शतक हुकले. या दरम्यान स्टीव्ह स्मिथने राजकोट वनडेत एक मोठा पराक्रम केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्मिथ सर्वात जलद ५००० धावा करणारा ठरला चौथा ऑस्ट्रेलियन खेळाडू –

वास्तविक, स्टीव्ह स्मिथने राजकोट वनडेमध्ये ५००० वनडे धावा पूर्ण केल्या आहेत. स्टीव्ह स्मिथ ५ हजार धावा पूर्ण करणारा १७वा ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरला आहे. तसेच, सर्वात जलद ५ हजार करणारा तो चौथा ऑस्ट्रेलियन बनला आहे. त्याने १२९ एकदिवसीय डावात हा पराक्रम केला. स्मिथच्या आधी डीन जोन्सने १२८ डावांत ५ हजार धावा पूर्ण केल्या होत्या. सर्वात जलद पाच हजार धावा पूर्ण करणारा ऑस्ट्रेलियन फलंदाज डेव्हिड वॉर्नर आहे. त्याने ११५ डावात ही कामगिरी केली. अॅरॉन फिंचने १२६ डावात ही कामगिरी केली.

पाच हजार धावांचा टप्पा गाठण्यापासून स्टीव्ह स्मिथ अवघ्या २० धावा दूर होता. राजकोट वनडेत २० धावा पूर्ण करताच त्याने हे यश आपल्या नावावर नोंदवले. वृत्त लिहिपर्यंत स्टीव्ह स्मिथ ६१ चेंडूत ७४ धावा केल्या. त्याला मोहम्मद सिराजने बाद केले. त्याचबरोबर मार्नस लाबुशेन ८ चेंडूत १२ धावांवर खेळत आहे. ऑस्ट्रेलिया संघाने ३१ षटकांनंततर ३ बाद २३७ धावा केल्या आहेत.

हेही वाचा – Asian Games: युवराज सिंगचा ‘तो’ विक्रम मोडणारा कोण आहे नेपाळी क्रिकेटपटू दीपेंद्र सिंग ऐरी? जाणून घ्या

स्मिथची एकदिवसीय कारकीर्द –

स्मिथच्या एकदिवसीय कारकिर्दीवर एक नजर टाकली तर त्याने २०१० मध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. तेव्हापासून आतापर्यंत (२७ सप्टेंबर २०२३), स्टीव्ह स्मिथने १४५ एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ४४.३८ च्या उत्कृष्ट सरासरीने ५०१५ धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये स्मिथच्या नावावर १२ शतके आणि २९ अर्धशतके आहेत. १६४ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Steve smith became the 17th australian batsman to complete 5000 runs in ind vs aus odi match vbm