भारताविरूद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३३८ धावांपर्यंत मजल मारली. अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथने दमदार शतक झळकावत संघाला तीनशेपार मजल मारून दिली. स्मिथने सुरूवातीला लाबूशेनच्या साथीने अर्धशतक ठोकलं. पण लाबूशेनने नंतर एका बाजूने गडी बाद होत असताना किल्ला लढवत त्याने आपलं शतक पूर्ण केलं. २२६ चेंडूत त्याने १६ चौकारांसह १३१ धावा केल्या. स्टीव्ह स्मिथ म्हणजे टीम इंडियाची डोकेदुखी हे समीकरण या डावातही खरं ठरलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भारतीय संघाच्या गोलंदाजांनी दुसऱ्या दिवशीच्या खेळात झटपट बळी टिपले. जाडेजा, बुमराह आणि सैनी या तिघांनी भेदक मारा करत ऑस्ट्रेलियन फलंदाजांना माघारी धाडलं. पण स्टीव्ह स्मिथला मात्र बाद करणं भारतीय गोलंदाजांना जमत नव्हतं. याचदरम्यान स्मिथने दमदार अर्धशतक ठोकत नवा विक्रम रचला. कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाविरूद्ध सर्वाधिक ८ षटकं लगावण्याचा विक्रम स्टीव्ह स्मिथने रचला. त्याने सर गॅरी सोबर्स, सर व्हिव्हियन रिचर्ड्स आणि माजी कर्णधार रिकी पॉन्टींगच्या विक्रमाशी बरोबरी केली. पण या साऱ्यांमध्ये कमी डावांत ८ शतकं झळकावण्याचा विक्रम करत त्याने यादीत अव्वल स्थान पटकावले.

आणखी वाचा- Video: एकच नंबर!! जाडेजाने स्मिथला ‘असं’ धाडलं तंबूत

आणखी वाचा- IND vs AUS: आज की नारी….!! कसोटी सामन्यात पहिल्यांदाच घडली ‘ही’ गोष्ट

भारताविरूद्ध स्मिथने २५ डावांमध्ये ८ शतकं ठोकली. ही कामगिरी करण्यासाठी सर गॅरी सोबर्स यांना ३० डाव, सर व्हिव्हियन रिचर्ड्स यांना ४१ डाव तर रिकी पॉन्टींगला ५१ डाव लागले होते. या यादीत सर एव्हर्टन वीक्स यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यांनी भारताविरूद्ध अवघ्या १५ डावांत ७ शतकं लगावली होती. स्मिथच्या १३१ धावांव्यतिरिक्त मार्नस लाबूशेन (९१) व विल पुकोव्हस्कीची (६२) यांची अर्धशतकेदेखील ऑस्ट्रेलियासाठी महत्त्वाची ठरली.