Steve Smith broke Rahul Dravid big record: ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथने अ‍ॅशेसच्या दुसऱ्या कसोटीत शतक झळकावले आहे. लॉर्ड्सवर इंग्लंड विरुद्ध सामन्याच्या दुसऱ्या दिवशी स्टीव्हने शतक झळकावले. पहिल्या दिवशी तो ८५ धावांवर खेळत होता. ३४ वर्षीय स्मिथचे हे कसोटीतील ३२वे शतक आहे. स्मिथने १६९ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याने आपले शतक पूर्ण करताना १४ चौकार मारले. त्याच्या तुफानी खेळीमुळे  सचिन, लारा यांसारख्या अनेक दिग्गजांचे विकम मोडले गेले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

स्मिथचे इंग्लंडविरुद्धचे १२वे शतक

इंग्लंडविरुद्ध स्टीव्ह स्मिथची बॅट जबरदस्त बोलते. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लिश संघाविरुद्धचे हे त्याचे १२वे शतक आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध ३५ कसोटी सामन्यांमध्ये १२ अर्धशतकेही केली आहेत. एजबॅस्टन येथे झालेल्या अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या सामन्यात स्मिथची बॅट शांत होती. पहिल्या डावात १६ धावांवर बाद झाल्यानंतर दुसऱ्या डावात त्याला केवळ ६ धावाच करता आल्या. मात्र या सामन्यात त्याने सर्व मागचे हिशोब पूर्ण केले. जेव्हा तो खेळपट्टीवर फलंदाजीसाठी आला तेव्हा गोलंदाजांना खूप मदत होती, चेंडू स्विंग होत होता. त्याने १०२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.

राहुल द्रविडचा विक्रम मोडला

असे म्हणतात की, विक्रम तोडण्यासाठी बनवले जातात. असेच काहीसे राहुल द्रविडच्या विक्रमाबाबत घडले. स्टीव्ह स्मिथने लंडनमधील लॉर्ड्स स्टेडियमवर अ‍ॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी नाबाद १०२ धावा करताना ९,००० कसोटी धावा पूर्ण केल्या. इथपर्यंत पोहोचणारा तो दुसरा वेगवान खेळाडू ठरला. स्टीव्ह स्मिथने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या अ‍ॅशेस कसोटीत १७४ डावांत ही कामगिरी केली.

हा आकडा गाठण्यासाठी द्रविडने १७६ डाव खेळले होते, पण स्मिथने त्याच्यापेक्षा २ डाव कमी खेळले आहेत. या यादीत भारताचा महान द्रविडच नाही तर वेस्ट इंडिजचा ब्रायन लारा, सचिन तेंडुलकर आणि सुनील गावसकरही मागे आहेत. लारा आणि रिकी पाँटिंगच्या नावावर प्रत्येकी १७७ धावा आहेत, तर सचिन तेंडुलकरच्या नावावर १७९ डावात ९००० धावा करण्याचा विक्रम आहे.

हेही वाचा: Sachin Tendulkar: क्रिकेटचे दोन दिग्गज तेंडुलकर-लारा लंडनच्या रस्त्यावर भेटले; सोशल मीडियावर चाहत्यांच्या मजेशीर कमेंट्स

‘स्टीव्ह वॉ’ची केली बरोबरी

स्टीव्ह स्मिथने कसोटीत सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार ‘स्टीव्ह वॉ’ची बरोबरी केली आहे. १६८ कसोटी खेळलेल्या वॉने ३२ शतके झळकावली आहेत. कसोटीत शतक ठोकण्याच्या बाबतीत त्याच्या पुढे १० फलंदाज आहेत. सचिन तेंडुलकर सर्वाधिक ५१ शतकांसह पहिल्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलिसने ४५ तर ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगने कसोटीत ४१ शतके झळकावली आहेत.

हेही वाचा: Virat Kohli: विराट इंग्लंडमध्ये नेमकं काय करतोय? किंग कोहलीचे लंडनच्या रस्त्यांवरील फोटो सोशल मीडियावर व्हायरल

सर्वात जलद ९००० कसोटी धावा करणारा फलंदाज

कुमार संगकारा – १७२ डाव

स्टीव्ह स्मिथ १७४ डाव

राहुल द्रविड – १७६ डाव

ब्रायन लारा – १७७ डाव

रिकी पाँटिंग – १७७ डाव