आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहली आणि स्टिव्ह स्मिथ हे दोन तरुण कर्णधार सध्या मैदान गाजवत आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने घरच्या मैदानावर आपलं वर्चस्व कायम राखलं आहे. इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, श्रीलंका यासारख्या प्रतिस्पर्ध्यांना भारताने पराभवाची धूळ चारली आहे. तर दुसरीकडे स्टिव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाच्या संघाने मानाच्या अॅशेस मालिकेचं विजेतेपद पटकावलं आहे. मात्र ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्नच्या मते, कसोटी क्रिकेटमध्ये स्टिव्ह स्मिथ विराट कोहलीच्या तुलनेत सरस खेळाडू आहे.

अवश्य वाचा – अ‍ॅशेस पुन्हा ऑस्ट्रेलियाकडे

आपल्या सर्वोत्तम ११ खेळाडूंची यादी जाहीर करताना शेन वॉर्नने स्मिथ आणि कोहली यांना १० व्या क्रमांकाचं स्थान दिलं आहे. वन-डे, टी-२० आणि कसोटी अशा तिन प्रकारांचा विचार केला असता विराट कोहली सर्वोत्तम खेळाडू आहे. मात्र कसोटी क्रिकेटमध्ये मला स्टिव्ह स्मिथ कोहलीपेक्षा उजवा वाटतो. एका खासगी वृत्तपत्रात लिहीलेल्या कॉलममध्ये शेन वॉर्नने आपलं मत मांडलं आहे.

अवश्य वाचा – ‘विराट कोहलीच टीम इंडियाचा बॉस’

आकड्यांपेक्षा एखाद्या खेळाडूची खेळी संघाच्या विजयात किती हातभार लावते ही गोष्ट आपल्यासाठी महत्वाची ठरत असल्याचं शेन वॉर्नचं म्हणणं आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि भारत या ३ देशांमध्ये शतक झळकावणारा खेळाडू हा आपल्या दृष्टीकोनातून सरस असल्याचं शेनने म्हणलं आहे. तिनही देशांमधल्या खेळपट्ट्या या भिन्न स्वरुपाच्या असतात, याचसोबत वातावरणाशी जुळवून घेताना आपल्या कामगिरीत सातत्य राखणं प्रत्येक फलंदाजासाठी आव्हानात्मक काम असतं. भारतात विराट कोहलीने आपण एक चांगला फलंदाज असल्याचं सिद्ध करुन दाखवलं आहे, मात्र इंग्लंडच्या खेळपट्ट्यांवर त्याचं अपयश झाकलं जात नसल्याचंही शेन वॉर्नने आवर्जून नमूद केलं.

Story img Loader