IND vs AUS 4th Test Match Updates: विराट कोहलीने रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध (IND vs AUS) आणखी एक शतक झळकावले. विराट कोहलीने तब्बल साडेतीन वर्षांनंतर कसोटी फॉरमॅटमधील शतकाचा दुष्काळ संपवला. कोहलीचे हे कसोटी क्रिकेटमधील २८ वे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ७५ वे शतक आहे. भारताचा स्टार फलंदाज विराटने २४१ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. परंतु त्यानंतर अवघ्या १४ धावांनी त्याचे द्विशतक हुकले. बाद झाल्यानंतर विराट कोहली मैदानाबाहेर जात असताना स्मिथने त्याची भेट घेत हस्तांदोलन केले.

जगभरात उपस्थित असलेल्या कोहलीच्या चाहत्यांसाठी हा दिवस खूप खास होता. कोहलीच्या या शानदार खेळीची क्रिकेट विश्वात सर्वत्र चर्चा होत आहे. त्याचवेळी कांगारू संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ ही खेळी पाहून कोहलीचे कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये स्मिथ कोहलीची खास स्तुती करताना दिसत आहे.

Karun Nair Smashed 88 Runs Against Maharashtra in Semi Final Vijay Hazare Trophy Innings
Karun Nair: करूण नायरचं विजय हजारे ट्रॉफीमधील वादळ कायम, सेमीफायनलमध्ये महाराष्ट्राच्या गोलंदाजांना दिवसा दाखवले तारे
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Akash Deep has revealed How Virat Kohli gifted his bat that saved Gabba Test for India
Virat Kohli : ‘मी बॅट मागितली नव्हती, त्यानेच…’, गाबा कसोटी वाचवणाऱ्या आकाशदीपचा विराटच्या बॅटबद्दल मोठा खुलासा
Virat Kohli knows he is past his best and that will hurt David Lloyd statement after his poor test form
Virat Kohli : ‘विराट कोहलीचा काळ गेला…’, इंग्लंडच्या माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘वयाबरोबर प्रत्येकजण…’
Kapil Dev Statement on Rohit Sharma Virat Kohli Test Retirement Said They know when to call time
Kapil Dev On Rohit-Virat: “ते दोघं मोठे खेळाडू, त्यांना वाटेल तेव्हा…”, कपिल देव यांचं रोहित-विराटच्या निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
Yograj Singh coach of Arjun Tendulkar
Yograj Singh: अर्जुन तेंडुलकरनं योगराज सिंग याचं कोचिंग मध्येच का सोडलं? युवराज सिंगच्या वडिलांनी सांगितलं खरं कारण
Just tell Virat Kohli you have a match against Pakistan Shoaib Akhtar advice to India Champions Trophy vbm
Champions Trophy 2025 : ‘त्याला सांगा पाकिस्तानविरुद्ध मॅच आहे…’, विराटला फॉर्ममध्ये आणण्यासाठी शोएब अख्तरने भारताला दिला खास मंत्र
Virat Kohli Didnt Liked Ambati Rayudu Robin Uthappa Reveals 2019 World Cup Team Selection
Robin Uthappa on Virat Kohli: “विराटला तो आवडत नव्हता”, स्फोटक फलंदाजाला २०१९ च्या वर्ल्डकप संघातून वगळण्याबाबत रॉबिन उथप्पाचा मोठा खुलासा

भारताचा माजी कर्णधार कोहलीने अहमदाबाद कसोटीच्या चौथ्या दिवशी १८६ धावा केल्या. अवघ्या १४ धावांनी त्याचे द्विशतक हुकले. टॉड मर्फीने कोहलीला मिड-विकेटवर मार्नस लॅबुशेनकरवी झेलबाद केले. दरम्यान, जेव्हा कोहली पॅव्हेलियनकडे परत जाऊ लागला, तेव्हा स्मिथ आला आणि त्याने कोहलीशी हस्तांदोलन केले, त्याच्या पाठीवर थाप मारली आणि त्याच्या या शानदार खेळीसाठी त्याचे अभिनंदन केले. स्मिथनंतर मर्फीनेही हस्तांदोलन करून दिग्गज फलंदाजाचे अभिनंदन केले.

विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला –

अहमदाबाद कसोटीत शतक झळकावताच, विराट कोहलीने महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडीत काढला आहे. सर्वात कमी डावात ७५ शतके झळकावणारा विराट जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने हा विक्रम ५२२ डावांमध्ये केला, तर सचिनने ७५ आंतरराष्ट्रीय शतके करण्यासाठी ५६६ डाव घेतले होते.

हेही वाचा – IND vs AUS 4th Test: विराटचं द्विशतक रोखण्यासाठी कांगारूंची रणनिती; फोटो झाला व्हायरल, एकही फिल्डर…

चौथ्या दिवसाचा खेळ संपला –

अहमदाबाद कसोटीतील चौथ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची धावसंख्या बिनबाद तीन धावा आहे. मॅथ्यू कुहनेमन खाते न उघडता क्रीजवर आहे. त्याचवेळी ट्रॅव्हिस हेड तीन धावा करून त्याच्यासोबत खेळत आहे. भारताकडे अजूनही ८८ धावांची आघाडी आहे. सामन्याच्या शेवटच्या दिवशी कांगारू संघाला छोट्या धावसंख्येवर गुंडाळण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. भारतीय संघाने पाचव्या दिवशीच्या खेळपट्टीवर चमत्कार घडवला तर तो सामना जिंकू शकतो. सपाट खेळपट्टीवर हा सामना ड्रॉच्या जवळ आहे.

Story img Loader