IND vs AUS 4th Test Day 2 Updates in Marathi: भारत-ऑस्ट्रेलिया मेलबर्न कसोटीच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू स्टीव्ह स्मिथने ऐतिहासिक शतक झळकावलं आहे. स्मिथने दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होताच झटपट धावा करत आपले ३४वे कसोटी शतक पूर्ण केले, तर या मालिकेतील हे ऑस्ट्रेलियाचे सलग दुसरे शतक आहे. मेलबर्न कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा स्मिथ ६८ धावांवर नाबाद होता, त्यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होताच त्याने कर्णधार पॅट कमिन्ससह ७व्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली आणि १६७ धावा करत १०० धावांचा आकडा गाठला. यासह स्मिथ भारताविरूद्ध नव्या ऐतिहासिक विक्रमाची नोंद केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

स्टिव्ह स्मिथने चौकारासह १६७ चेंडूत १०३ धावा करत आपले ३४ वे कसोटी शतक पूर्ण केले. तर भारताविरूद्ध हे त्याचे ११ वे कसोटी शतक आहे. या शतकासह स्टीव्ह स्मिथने जो रूटला मागे टाकले असून तो आता भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करणारा फलंदाज बनला आहे. रुटने भारताविरुद्ध कसोटीत १० शतकी खेळी केल्या आहेत.

हेही वाचा – IND vs AUS: “मी विराटला ओळखतो…,” कॉन्स्टास-कोहलीमध्ये मैदानात नेमकं काय घडलं? उस्मान ख्वाजाने सांगितला प्रसंग

स्मिथने आता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करण्याच्या बाबतीत केन विल्यमसनला मागे टाकलं आहे, तर त्याने सुनील गावस्कर आणि ब्रायन लारा यांच्याशी बरोबरी केली आहे, ज्यामध्ये दोन्ही खेळाडूंनी ३४-३४ शतकं झळकावली होती.

हेही वाचा – IND vs AUS: भारतीय संघ मेलबर्न कसोटीच्या दुसऱ्या दिवशी हातावर काळी पट्टी बांधून का उतरला? काय आहे नेमकं कारण

भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकी खेळी करणारे खेळाडू

स्टीव्ह स्मिथ – ११ शतकं

जो रूट – १० शतकं

रिकी पाँटिंग – ८ शतकं

व्हिव्हियन रिचर्ड्स – ८ शतकं

गॅरी सोबर्स – ८ शतकं

हेही वाचा – Vijay Hazare Trophy: शार्दूल ठाकूरच्या नेतृत्वात मुंबईने उडवला अरुणाचलचा धुव्वा; अवघ्या ३३ चेंडूत जिंकला सामना

बॉक्सिंग डे कसोटी आणि मेलबर्न क्रिकेट मैदानावरील पाचवं शतक

नाताळच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २६ डिसेंबरपासून सुरू होणारा कसोटी सामना बॉक्सिंग-डे कसोटी म्हणूनही ओळखला जातो, ज्यामध्ये स्मिथचे हे ५वे शतक आहे आणि यासह तो ऑस्ट्रेलियाचा अनुभवी कर्णधार रिकी पाँटिंगला मागे सोडण्यात यशस्वी झाला आहे. पॉन्टिंगने बॉक्सिंग-डे कसोटी सामन्याच्या इतिहासात एकूण ४ शतकी खेळी खेळली होती. या यादीत मॅथ्यू हेडन पहिल्या क्रमांकावर आहे, ज्याच्या नावावर बॉक्सिंग-डे कसोटीत एकूण ६ शतके आहेत. याचबरोबर स्मिथचे हे मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवरीलही पाचवे शतक आहे.