IND vs AUS Champions Trophy Semi Final Updates Marathi: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा पहिला उपांत्य सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवला जात आहे. दुबईत होत असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे फलंदाज मोठे नशीब घेऊन मैदानात उतरले आहेत. यामागचं कारण म्हणजे ट्रॅव्हिस हेड ३ वेळा बाद होता होता वाचला, तर स्टिव्ह स्मिथबरोबर तर एक अतिशय आश्चर्यकारक घटना घडलेली पाहायला मिळाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कांगारू संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ अर्धशतक झळकावत मैदानात कायम आहे आणि संघाचा डाव सावरत आहे. स्टीव्ह स्मिथ क्लीन बोल्ड होता होता थोडक्यात वाचला. त्याने १४व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अक्षर पटेलविरुद्ध बचावात्मक फलंदाजी करण्याचा प्रयत्न करत होता. पण पॅडवरच्या काठावर आदळल्यानंतर चेंडू स्टंपला जाऊन लागला. पण तरीही स्टीव्ह स्मिथ बाद झाला नाही. आयसीसीच्या नियमामुळे त्याला बाद करण्यात आले नाही.

स्मिथने चेंडू खेळल्यानंतर चेंडू फिरला आणि ऑफ-स्टंपच्या पायावर जाऊन आदळला. या चेंडूवर नशिबाने स्मिथला साथ दिली आणि स्टंपवर चेंडू आदळूनही बेल्स विखुरल्या नाहीत. याच कारणामुळे स्मिथला बाद करण्यात आले नाही. आता आयसीसीचे नियम काय म्हणतो ते जाणून घेऊया.

ICC च्या नियमामुळे स्टीव्ह स्मिथ राहिला नाबाद

MCC च्या २९ नियमानुसार, कोणत्याही फलंदाजाला बाद होण्यासाठी, स्टंपवर किमान एक बेल तरी थेट जमिनीवर पडली पाहिजे. तसं झाले नाही तर किमान एक स्टंप जमिनीतून पूर्णपणे उखाडला जाणं आवश्यक आहे. त्यानंतरच फलंदाज बाद मानला जाईल. दोन्ही गोष्टी स्मिथच्या बाबतीत घडल्या नाहीत. त्यामुळे तो बाद होण्यापासून बचावला.

१४व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ही संपूर्ण घटना घडली. शेवटच्या चेंडूवर तो धावबाद होण्यापासून वाचला. त्याने शॉर्ट फाइन लेगवर चेंडू खेळला आणि एकेरी धाव घेण्यासाठी धावला. पण दुसऱ्या टोकाला उभ्या असलेल्या मार्नस लबुशेनने धाव घेण्यास नकार दिला. त्यामुळे धावबाद होण्याची संधी निर्माण झाली. पण वरूणने चेंडू उशिरा फेकल्याने ही संधी हुकली. यानंतर स्मिथ ३५ षटकांनंतरही ७१ धावांवर नाबाद असून खेळत आहे.