Steve Waugh, Test Cricket: ऑस्ट्रेलियाचा माजी विश्वचषक विजेता कर्णधार आणि दिग्गज खेळाडू स्टीव्ह वॉ याने कसोटी क्रिकेट संपत चालल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. वॉने दक्षिण आफ्रिका संघाचा उदाहरण देत हे मत शेअर केले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी कमकुवत संघ पाठवल्याबद्दल त्याने आफ्रिकन संघावर जोरदार टीका केली आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाला काही प्रश्न देखील विचारले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिडनी मॉर्निंग हेराल्डशी बोलताना स्टीव्ह वॉ म्हणाला, “जर आयसीसी किंवा इतर कोणीतरी या घटनेवर लवकर कारवाई केली नाही तर कसोटी क्रिकेट हे इतिहास जमा होऊन जाईल. कसोटी क्रिकेट ही कसोटी क्रिकेटच राहून जाईल कारण तुम्ही सर्वोत्तम खेळाडूंविरुद्ध स्वतःची परीक्षा घेत नाहीये. मला समजले की, मुख्य खेळाडू या दौऱ्यावर येत नाहीत. त्यांना योग्य मोबदला मिळत नाही का? नेमकं काय आहे यामागील कारण, आफ्रिकन बोर्डाने स्पष्ट करावे.”

हेही वाचा: IND vs SA 2nd Test: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत ‘या’ खेळाडूला संधी मिळावी, इरफान पठाणने टीम इंडियाला दिला सल्ला

वॉ पुढे म्हणाला, “मला समजत नाही की आयसीसी किंवा जे मोठे देश भरपूर पैसे कमवत आहेत त्यांच्याकडे कसोटी सामन्यांसाठी नियमन शुल्क का नाही. जे एक प्रीमियम क्रिकेट बोर्ड आहेत त्यांनी यावर आवाज उठवणे गरजेचे आहे. कसोटी क्रिकेट ही काळाची गरज असून लोकांना कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे.” तो पुढे म्हणाला, “श्रीमंत क्रिकेट बोर्डाने याबाबत काहीतरी नियम करणे गरजेचे आहे.”

दक्षिण आफ्रिकेने सध्या आपले लक्ष १० जानेवारीपासून सुरू होणाऱ्या SA२० कडे वळवले आहे. टी-२० विश्वचषक जवळ आल्याने प्रोटीज संघांने खेळाच्या सर्वात लहान स्वरूपाकडे आपले लक्ष वळवले आहे. मात्र, दक्षिण आफ्रिकेची ही वृत्ती स्टीव्ह वॉ ला अजिबात आवडली नाही. न्यूझीलंडने आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका खेळू नये, असे त्याचे मत आहे. याशिवाय आयसीसीने यात हस्तक्षेप करावा, अशी त्याने विनंती केली आहे.

वॉ पुढे म्हणाला, “मी जर न्यूझीलंडचा खेळाडू असतो तर मी मालिका खेळली नसती. ते का खेळत आहेत हे मला माहीत नाही. न्यूझीलंड क्रिकेटबद्दल आदर नसताना तेथील खेळाडूंनी खेळू नये, ते असे का करत आहेत? माहिती नाही. दक्षिण आफ्रिका नाहीतरी फक्त T१० किंवा टी-२० खेळतात.” न्यूझीलंड दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिकेने १४ सदस्यीय संघ निवडला आहे. दोन कसोटी मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या संघात नील ब्रँडला कर्णधार बनवण्यात आले आहे, तर ७ अनकॅप्ड खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचा: David Warner: डेव्हिड वॉर्नरने त्याच्या कारकीर्दीतील निवडला सर्वात घातक गोलंदाज, कोण आहे तो? जाणून घ्या

न्यूझीलंड दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिका संघ

नील ब्रँड (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, रुआन डी स्वार्ड, क्लाईड फोर्टुइन, झुबेर हमझा, त्शेपो मोरेकी, मिहलाली मपोंगवाना, डुआन ऑलिव्हियर, डेन पीटरसन, कीगन पीटरसन, डेन पिएड, रेनार्ड व्हॅन टोंडर, शॉन वॉन बर्ग आणि खाया झोंडो.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Steve waugh expresses concern over end of test cricket said if icc doesnt intervene test cricket will end avw
Show comments