भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीवर सोमवारी टीका केल्यानंतर मंगळवारी त्याच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षांव ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव वॉ याने केला आहे. गांगुलीने भारतीय संघाला बळकटी दिली असे मत वॉ याने व्यक्त केले आहे.
‘‘सौरव गांगुली हा एक महान कर्णधार आहे, हे तुम्हाला माहिती आहेच, पण त्याने भारतीय संघाला बळकटी दिली. त्याच्यामुळे भारतीय संघ अधिक सक्षम झाला.’’ असे वॉने सांगितले.
गांगुली आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या तुलनेबाबत विचारल्यावर वॉ म्हणाला की, त्या दोघांचीही पद्धत निराळी आहे. पण तसे असले तरी ते दोघेही चांगल्या कर्णधारांच्या यादीमध्ये आहेत.
अ‍ॅशेस मालिकेतील ऑस्ट्रेलियाच्या कामगिरीबद्दल वॉ यांना विचारले ते म्हणाले की, नुकत्याच झालेल्या तिसऱ्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाची दमदार कामगिरी पाहायला मिळाली. त्यांना दुर्देवाने सामना जिंकता आला नसला तरी या कामगिरीने त्यांचे मनोबल नक्कीच उंचावेल. मालिकेत २-२ अशी बरोबरी करणे मायकेल क्लार्कच्या संघाला नक्कीच कठिण आहे, पण तरीही त्यांच्यामध्ये हे यश मिळवण्याची कुवत आहे. ऑस्ट्रेलियाच्या सध्याच्या संघात युवा खेळाडू जास्त असून भविष्यात या गोष्टीचा फायदा ऑस्ट्रेलियाला नक्कीच होईल.

Story img Loader