स्टीव्हन फिनने घेतलेल्या सहा विकेट्सच्या जोरावर इंग्लंडने तिसऱ्या कसोटीत न्यूझीलंडचा डाव ४४३ धावांत गुंडाळला. १ बाद २५० वरून पुढे खेळणाऱ्या न्यूझीलंडला लगेचच धक्का बसला. शतकाच्या दिशेने आगेकूच करणाऱ्या केन विल्यमसनला अँडरसनने बाद केले. रॉस टेलर पानेसरच्या गोलंदाजीवर बाद झाला. शतकवीर पीटर फुल्टनला फिनने बाद केले. त्याने १५ चौकार आणि ३ षटकारांसह १३६ धावा केल्या. फिनच्या गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचे अन्य फलंदाज टिकाव धरू शकले नाहीत. फिनने १२५ धावांच्या मोबदल्यात सहा फलंदाजांना माघारी धाडले. प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडची सुरुवातही डळमळीत झाली. कुक आणि ट्रॉटला ट्रेंट बोल्टने बाद केले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडच्या २ बाद ५० धावा झाल्या आहेत.

Story img Loader