शरीरसौष्ठवाच्या चालत्याबोलत्या विद्यापीठाने जागवल्या आठवणी
प्रेमचंद डोगरा हे नाव उच्चारताच शरीरसौष्ठवाचे वैभवशाली पर्व डोळ्यासमोर उभे राहते. मि. युनिव्हर्स, मि. आशिया आणि सलग नऊ मिस्टर इंडिया किताबांसह पद्मश्री आणि अर्जुन पुरस्काराने सन्मानित प्रेमचंद म्हणजे शरीरसौष्ठवाचे चालतेबोलते विद्यापीठच! त्यांच्या पोतडीतील असंख्य चषक, ढाली, सन्मानचिन्हे या साऱ्यांचे संग्रहालय प्रेमचंद यांच्या होशियारपूरमधील घरात तयार करण्यात आले आहे. इतिहासाच्या सोनेरी आठवणींना प्रेमचंद आपल्या घरात पाहुण्यांसमोर उजाळा देतात. त्यानंतर उलगडत जाते ती प्रेमचंद पर्वाची कहाणी!
पाकिस्तानातून निर्वासित म्हणून भारतात आलेल्या कुटुंबात प्रेमचंदचा जन्म झाला. दहाव्या वर्षीच पितृशोकाचे दु:ख ओढवले, मात्र आईचे संस्कार आणि सकस दुधाचा खुराक याच्या बळावरच निरोगी शरीर जोपासल्याचे प्रेमचंद सांगतात. शालेय स्तरावर कुस्तीमध्ये नाव कमवत असतानाच ब्रह्मदत्त नावाच्या शिक्षकांच्या सल्ल्यानुसार प्रेमचंद शरीरसौष्ठवाकडे वळले आणि पुढे इतिहास घडला.
आíथक स्थिती बेताची असताना केवळ जिद्दीच्या बळावर पाकिस्तानमध्ये जाऊन पहिल्यांदा आशियाई जेतेपदावर नाव कोरले, हा क्षण अतीव समाधान देणारा असल्याचे प्रेमचंद सांगतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने चांगली कामगिरी केल्याने आमच्याकडून खेळण्याची ऑफर अमेरिकेने ठेवली होती, मात्र खेळेन तर भारतासाठीच, या भूमिकेने हा पर्याय ठामपणे नाकारल्याचे प्रेमचंद सांगतात. भारत गरीब देश आहे, भारतीय खेळाडू विश्वविजेता होऊ शकत नाही ही अमेरिकन लोकांची टीका मनाला चटका लावून गेली आणि या टीकेला प्रत्युत्तर देत १९८८ साली ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलॅण्डमध्ये विश्वविजेतपदावर नाव कोरले, भारतीय तिरंगा अभिमानाने फडकावला हे सांगताना प्रेमचंद यांच्या डोळ्यांत वेगळीच चमक जाणवते.
नैसर्गिक ताकद हीच खरी शक्ती, जग जिंकायचेय या भावनेने खेळलो, एकदाही उत्तेजकाची मदत घेतली नाही आणि म्हणूनच हे यश साकारले, असे प्रेमचंद अभिमानाने सांगतात. भारतात अनेक प्रतिभाशाली शरीरसौष्ठवपटू आहेत हे सांगतानाच कारकीर्द संपल्यानंतर खेळाडूंनी खेळासाठी योगदान द्यायला हवे, असे प्रेमचंद आग्रहाने सांगतात. कारकीर्दीत महाराष्ट्राने खूप काही दिले, ते माझे दुसरे घरच असल्याचे प्रेमचंद सांगतात.   

Raju Kendre Founder and CEO of Eklavya India Foundation was awarded the International Alum of the Year Award Nagpur news
नागपूर: शेतकरी पुत्राचा पुन्हा सन्मान! राजू केंद्रे यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
World Economic Forum President Klaus Schwab visited at Chief Minister Eknath Shinde residence
मुंबईचे जागतिक आर्थिक केंद्राचे स्वप्न दृष्टिपथात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम एमएमआरडीए यांच्यात सामंजस्य करार
Priyanka Chopra Praises Aaj Ki Raat song from stree 2
प्रियांका चोप्रा ‘स्त्री २’मधील ‘या’ गाण्याच्या प्रेमात; कलाकारांची स्तुती करीत म्हणाली, “तू एकदम छान, तो तर अगदी सोनं”
preeti kumari from bihar sahrasa known as wrestling king sports department honored her
जिल्ह्यात पहिल्यांदाच मिळवला कुस्तीपटूचा सन्मान अन् झाली ‘कुस्ती किंग’; बिहारमधील प्रीती कुमारी आहे तरी कोण?
Dispute over Emergency movie getting Censor Board certificate in High Court
‘इमर्जन्सी’ला सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र मिळण्याचा वाद उच्च न्यायालयात
Loksatta Chatura Henrietta Lakes made a significant contribution to the Research of cancer
कॅन्सरच्या संशाेधनात मोलाचं योगदान देणारी हेनरिएटा लेक्स
Shreyas Iyer Offers his Chair to Rohit Sharma Wins Internet watch Video
Video : रोहित शर्माला पाहताच उभा राहिला श्रेयस अय्यर! खुर्चीवरून उठला अन् केलं असं काही…; ‘त्या’ कृतीचं सर्वत्र होतंय कौतुक