Stuart Binny scoring 31 runs in last over against UAE : सध्या हाँगकाँग सुपर सिक्स स्पर्धा रोमांचक टप्प्यात पोहोचली आहे. यावेळी भारतानेही या स्पर्धेत भाग घेतला. भारतीय संघ आता हाँगकाँग सुपर सिक्स स्पर्धेतून बाहेर पडला आहे. टीम इंडियाला स्पर्धेची पुढील फेरी गाठण्यासाठी यूएईविरुद्ध खेळवण्यात आलेला सामना जिंकणे आवश्यक होते, परंतु भारतीय संघाने शेवटच्या षटकात तो सामना गमावला. टीम इंडियाने हा सामना अवघ्या एका धावेनी गमावला. भारताच्या गटातून पाकिस्तान आणि यूएई पुढील फेरीसाठी पात्र ठरले आहेत. या सामन्यातील शेवटचे षटक अतिशय रोमांचक होते. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अखेरच्या षटकात भारताने कुटल्या ३१ धावा –

टीम इंडियाला शेवटच्या षटकात विजयासाठी ३२ धावांची गरज होती. स्टुअर्ट बिन्नी भारताकडून स्ट्राइकवर होता. बिन्नीने षटकातील पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकला. पुढचा चेंडू वाईड होता. यानंतर, त्याने पुढील चार चेंडूंवर चार षटकार आणि या षटकातील पहिल्या पाच चेंडूंवर २९ धावा केल्या. आता टीम इंडियाला शेवटच्या चेंडूवर तीन धावांची गरज होती.

शेवटच्या चेंडूवर स्टुअर्ट बिन्नी केवळ एक धाव काढू शकला आणि टीम इंडियाला सामना गमवावा लागला. हे षटक खूपच रोमांचक होते. षटक सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाने सामना गमावला असे वाटत नव्हते, पण बिन्नीने विजयाच्या आशा निर्माण करुन आपल्या संघासाठी शेवटपर्यंत झुंज दिली.

हेही वाचा –

रॉबिन उथप्पाच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ स्पर्धेतन बाहेर –

दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना यूएईने १३० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ ६ षटकांत ४ गडी गमावून १२९ धावाच करू शकला. अशाप्रकारे भारताला या स्पर्धेत सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. गेल्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना ६ षटकांत ११९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने अवघ्या ५ षटकांत विजयावर शिक्कामोर्तब केला. या स्पर्धेत रॉबिन उथप्पा भारतीय संघाचे नेतृत्व करत होता