Stuart Broad became the first bowler to take 150 wickets: ॲशेस मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना लंडनमध्ये खेळला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी स्टुअर्ट ब्रॉडने इतिहास रचला. ॲशेसमध्ये १५० विकेट्स घेणारा तो इंग्लंडचा पहिला गोलंदाज ठरला. यामध्ये त्याने सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर मजल मारली आहे. इंग्लंडने पाचव्या सामन्यातील पहिल्या डावात सर्वबाद २८३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या डावात ८० षटकानंतर ७ बाद २०२ धावा केल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

स्टुअर्ट ब्रॉड ॲशेस मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे. हा अहवाल येईपर्यंत त्याने ७३ डावात १५१ विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान ब्रॉडची एका डावातील सर्वोत्तम कामगिरी १५ धावांत ८ विकेट्स आहे. यामध्ये १५० किंवा त्याहून अधिक विकेट घेणारा तो इंग्लंडचा पहिला गोलंदाज ठरला आहे. ॲशेसमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम शेन वार्नच्या नावावर आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू वॉर्नने ७२ डावात १९५ विकेट घेतल्या आहेत. या बाबतीत मॅकग्रा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ६० डावात १५७ विकेट घेतल्या आहेत.

स्टुअर्ट ब्रॉडच्या ओव्हर ऑल रेकॉर्डवर नजर टाकली, तर तेही उत्कृष्ट राहिले आहे. त्याने ३०७ कसोटी डावात ६०० विकेट्स घेतल्या आहेत. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये तीन वेळा दहा विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर २० वेळा पाच किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत. त्याने वनडे फॉरमॅटमध्ये १७८ विकेट घेतल्या आहेत. ब्रॉडने या फॉरमॅटमध्ये १२१ सामने खेळले आहेत.

हेही वाचा – Asian Games 2023: टीम इंडियाच्या पुरुष आणि महिला क्रिकेट संघांची थेट उपांत्यपूर्व फेरीत एन्ट्री, जाणून घ्या पूर्ण वेळापत्रक

पाचव्या कसोटी सामन्याबद्दल बोलायचे, तर इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद २८३ धावा केल्या होत्या. यादरम्यान हॅरी ब्रूकने ८५ धावांची शानदार खेळी केली. मोईन अलीने ३४ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या डावात ८० षटकानंतर ७ बाद २०२ धावा केल्या आहेत. सलामीवीर उस्मान ख्वाजा १५७ चेंडूत ४७ धावा करून बाद झाला. डेव्हिड वॉर्नर २४ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मार्नस लाबुशेन ९ धावा करून बाद झाला.