Stuart Broad fifth highest wicket taker in Tests Cricket: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात ॲशेस मालिकेतील चौथा सामना खेळला जात आहे. या सामन्यातील पहिला दिवसाचा खेळ बुधवारी पार पडला. या सामन्यात इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने एक मोठा विक्रम केला आहे. ट्रॅव्हिस हेडची विकेट घेत ब्रॉडने कसोटी क्रिकेटमधील ६०० विकेट्स पूर्ण केल्या. ही कामगिरी करणारा ब्रॉड हा इंग्लंडचा दुसरा गोलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी केवळ महान वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने इंग्लंडसाठी हा पराक्रम केला आहे.

स्टुअर्ट ब्रॉड जगातील पाचवा गोलंदाज ठरला –

स्टुअर्ट ब्रॉडच्या आधी जेम्स अँडरसनने हा विक्रम आपल्या नावावर केला असून सध्या त्याच्या नावावर ६८८ कसोटी विकेट्स आहेत. याशिवाय हा टप्पा गाठणारा ब्रॉड हा जागतिक क्रिकेटमधील पाचवा गोलंदाज ठरला. यासह ब्रॉड हा पराक्रम करणाऱ्या जगातील निवडक गोलंदाजांमध्ये सामील झाला आहे.

IND vs ENG Saqib Mahmood Triple Maiden Wicket Over
IND vs ENG: कानामागून आला, भारी पडला! व्हिसा दिरंगाई बाजूला सारत मेहमूदने भारताची उडवली दाणादाण, ३ चेंडूत ३ विकेट
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
U19 Eng vs SA bizarre run out as Aaryan Sawant video viral
U19 ENG vs SA : धक्कादायक! विचित्र रनआऊटच्या नादात थोडक्यात वाचला फिल्डर, VIDEO होतोय व्हायरल
SL vs AUS Josh Inglis scores century on debut test match in front of parents breaks many records at Galle
SL vs AUS : जोश इग्लिसचे कसोटी पदार्पणात विक्रमी शतक! मोडले अनेक विक्रम
Usman Khawaja becomes first Australian to score a Test double century in Sri Lanka at Galle
Usman Khawaja Double Century : उस्मान ख्वाजाचे ऐतिहासिक द्विशतक! श्रीलंकेत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला ऑस्ट्रेलियन
SL vs AUS Steve Smith becomes the 4th Australian to score 10000 runs in Test cricket at Galle
SL vs AUS : स्टीव्हन स्मिथचा मोठा पराक्रम! खाते उघडताच घडवला इतिहास; कसोटीत ‘ही’ कामगिरी करणारा ठरला चौथा ऑस्ट्रेलियन
England Beat India by 26 Runs Varun Chakravarthy Fifer Ben Duckett fifty IND vs ENG
IND vs ENG: टीम इंडियाची हुकली विजयाची हॅट्ट्रिक! इंग्लंडचं टी-२० मालिकेत दणक्यात पुनरागमन; वरूण चक्रवर्तीच्या कामगिरीवर फेरलं पाणी
IND vs ENG Suryakumar Yadav shed light on the situation, revealing that the exclusion of Mohammed Shami was purely a tactical decision
IND vs ENG : मोहम्मद शमी फिट की अनफिट? पहिल्या सामन्यातून वगळण्याबाबत सूर्यकुमार यादवने केला खुलासा

ख्वाजाची विकेट घेत खाते उघडले –

ब्रॉडने चौथ्या ॲशेस कसोटीच्या पहिल्या दिवशी उस्मान ख्वाजाची तीन धावांवर विकेट घेत आपले खाते उघडले. या अनुभवी वेगवान गोलंदाजाने दिवसाच्या खेळाच्या पहिल्या तासातच फॉर्मात असलेल्या ऑस्ट्रेलियन सलामीवीरला एलबीडब्ल्यू आऊट केले. यानंतर ब्रॉडने हेडला बाद करून हा विशेष विक्रम गाठला.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे पाच गोलंदाज –

मुथय्या मुरलीधरन – १३३ कसोटीत ८०० विकेट्स
शेन वॉर्न – १४५ कसोटीत ७०८ विकेट्स
जेम्स अँडरसन – १८२ कसोटीत ६८८* विकेट्स
अनिल कुंबळे – १३२ कसोटीत ६१९ विकेट्स
स्टुअर्ट ब्रॉड – १६६ कसोटीत ६००* विकेट्स

हेही वाचा – IND vs WI: दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहित शर्माची कशी असेल प्लेइंग इलेव्हन? दिनेश कार्तिकने केले भाकीत

ब्रॉडने इयान बोथमचा विक्रम मोडला –

उल्लेखनीय म्हणजे, शेन वॉर्नने २००५ च्या ॲशेस मालिकेत मँचेस्टरमध्ये मार्कस ट्रेस्कोथिकची विकेट घेऊन आपला ६०० वा कसोटी बळी घेतली होता. ब्रॉडने इयान बोथमचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रमही मोडला. इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यांमध्ये हेडची विकेट ही त्याची १४९ वी विकेट होती. जेम्स अँडरसनसोबतच ब्रॉडने १३३ कसोटीत मिळून १००० विकेट्स घेतल्या आहेत. यापूर्वी २८ जुलै २०२० रोजी, ब्रॉडने ५०० कसोटी बळी घेणारा इंग्लंडचा दुसरा गोलंदाज बनून महत्त्वपूर्ण टप्पा गाठला होता.

Story img Loader