Stuart Broad trying a trick against Marnus Labuschagne Video goes viral: ॲशेस मालिकेतील पाचवा कसोटी सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघांत ओव्हल येथे खेळला जात आहे. या सामन्यातील दुसऱ्या सामन्यात दिवशी ऑस्ट्रेलियाच्या डावातील ४३व्या षटकात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने ‘ट्रिक’ आजमावली. ज्यानंतर फलंदाजी करत असलेला मार्नस लाबूशेन बाद झाल्यानंतर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
या व्हिडीओत मार्नस लाबूशेन फलंदाजी करत असताना स्टुअर्ट ब्रॉड स्टंपजवळ येतो आणि बेल्स बदलताना दिसतो. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर मार्नस लबुशेन झेलबाद होतो. मार्क वुडच्या चेंडू मार्नस लॅबुशेनच्या बॅटची कड घेत पहिल्या स्लिपमधील जो रूटच्या हातावर विसावतो. यानंतर लाबूशेन अंपायरला काही तरी म्हणताना दिसतो. अशा पद्धतीने स्टुअर्ट ब्रॉडच्या ट्रिकचा इंग्लंडला फायदा होता.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर स्टुअर्ट ब्रॉडने ही ट्रिक आजमावण्याचे कारण सांगितले. स्टुअर्ट ब्रॉडने सांगितले की, त्याने ही युक्ती ऑस्ट्रेलियाकडून शिकली आहे. नॅथन लायन देखील हे करतो. स्टुअर्ट ब्रॉड म्हणाला, “मी ऐकले आहे की ही ट्रिक ऑस्ट्रेलियन संघ आपले नशीब बदलण्यासाठी आजमावतो. मी नॅथन लायनला हे अनेकदा करताना पाहिले आहे. सकाळच्या सत्रात, आम्हाला यश मिळवायचे होते आणि विचार केला की मी बेल्स बदलून पाहून. यात जादू दिसून आली, कारण पुढच्या चेंडूवर त्याने लाबुशेनचा रूटने शानदार झेल घेतला.”
हेही वाचा – IND vs WI 2nd ODI: सूर्यकुमार यादवऐवजी संजू सॅमसनला का मिळावी संधी? जाणून घ्या दोघांची आकडेवारी
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २९५ धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाचा डाव आटोपताच अंपायरनेही दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्याची घोषणा केली. इंग्लंडने पहिल्या डावात २८३ धावा केल्या होत्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला १२ धावांची आघाडी घेतली आहे. त्यानंतर तिसऱ्या दिवशी इंग्लंडने आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली आहे. इंग्लंडने २५ षटकानंतर १ बाद १३० धावा केल्या आहेत. क्रॉली ७१ आणि कर्णधार बेन स्टोक्स १२ धावांवर खेळत आहेत. त्यांनी ११८ धावांची आघाडी घेतली आहे.