क्रिकेटचा सामना म्हटलं की स्लेजिंग हा प्रकार आलाच. अनेकदा खेळाडू आपल्या प्रतिस्पर्ध्याचं लक्ष विचलीत करण्यासाठी सतत स्लेजिंग करत असतात. सध्या बंगळुरुत सुरु असलेल्या दुलीप करंडकाच्या अंतिम सामन्यातही इंडिया रेड संघाचा यष्टीरक्षक इशान किशनने प्रतिस्पर्धी संघाचा मयांक मार्कंडे फलंदाजी असताना स्लेजिंग करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करत असताना इंडिया ग्रीन संघाने २३१ धावांपर्यंत मजल मारली. संघातले महत्वाचे फलंदाज अपयशी ठरत असताना मयांक मार्कंडेने अखेरच्या फळीत संयमी खेळी करत अर्धशतक झळकावलं. त्याने १२१ चेंडूत ७ चौकार लगावत नाबाद ७६ धावा केल्या. मार्कंडे बाद होत नसल्याचं दिसताच यष्टींमागून इशान किशनने मयांकचं लक्ष विचलीत करण्यासाठी स्लेजिंगला सुरुवात केली. त्याचं हे स्लेजिंग स्टम्पजवळील माईकमध्ये रेकॉर्ड झालं आहे.

मयांक मार्कंडेला बाद करण्यासाठी इंडिया रेडच्या गोलंदाजांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. मात्र मयांकने अखेरपर्यंत संयम दाखवत खेळपट्टीवर तग धरुन आपल्या संघाला आश्वासक धावसंख्या उभारुन दिली. मयांक मार्कंडे ७६ धावांवर नाबाद राहिला.

Story img Loader