Ajay Jadeja on Travis vs Sehwag: एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताला पराभूत करण्यात ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅविस हेडने शानदार भूमिका बजावली होती. या स्टार सलामीवीराने १२० चेंडूत १३७ धावांची खेळी केली होती, ज्यामुळे भारताने ऑस्ट्रेलियाला दिलेले २४१ धावांचे लक्ष्य केवळ ४३ षटकात त्यांनी गाठले. या विजयामुळे ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक जिंकला. ट्रॅविस हेडने सहा सामन्यांत ३२९ धावा केल्या आणि गोलंदाजीमध्येही चांगले योगदान दिले. या त्याच्या कामगिरीवर भारतीय क्रिकेट संघाचा माजी स्टार खेळाडू अजय जडेजाला जेव्हा एका चाहत्याने विचारले की, “ट्रॅविस हेडची फलंदाजी वीरेंद्र सेहवागसारखीच आहे का?” यावर तो भडकला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेडची सेहवागशी तुलना केल्याने जडेजा संतापला

एका टीव्ही कार्यक्रमादरम्यान एका चाहत्याने जडेजाला विचारले की, “तुला वाटते का ट्रॅविस हेडची फलंदाजी ही वीरेंद्र सेहवागसारखीची आहे? मग तो हँड-आय कोऑर्डिनेशन असो किंवा चौकार-षटकार मारण्याची शैली, त्याची कसोटीत १०० पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने फलंदाजी असो?” या प्रश्नावर अजय जडेजा भडकला. जडेजा म्हणाला की, “हेडचे वय काय आहे? जर या व्यक्तीने वीरेंद्र सेहवागला खेळताना पाहिले असेल तर हा ‘हास्यास्पद प्रश्न’ आहे. वीरेंद्र सेहवागची ट्रॅविस हेडशी तुलना करण्यात काहीच तर्क नाही. एक उजव्या हाताचा फलंदाज आणि दुसरा डावखुरा फलंदाज. वीरेंद्र सेहवाग हा वीरेंद्र सेहवाग आहे, त्याच्यासारखा दुसरा कोणीही असू शकत नाही. तो पहिल्या चेंडूपासूनच फटके मारायला सुरुवात करत होता. या व्यक्तीने फायनलच्या पहिल्या काही षटकांमध्ये हेड कशी बॅटिंग करत होता हे पाहिलं का? उगाचच असे मूर्खासारखे प्रश्न विचारू नका.”

हेही वाचा: मोहम्मद शमीच्या आरोग्याविषयी अपडेट; संपूर्ण विश्वचषकात ‘हा’ त्रास अंगावर काढून घेतल्या २४ विकेट्स

यापूर्वी रिकी पाँटिंगने ट्रॅविसच्या कामगिरीचे कौतुक केले होते. पाँटिंग म्हणाला होता, “ट्रॅविस सध्या जगातील सर्व फॉरमॅटमधील खेळाडूंपैकी एक सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून उदयास येत आहे. त्याची कसोटीतील आकडेवारी अप्रतिम आहे. तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सध्या चांगली खेळी करतो आहे. नवीन चेंडूवर तो शानदार फटकेबाजी करतो आहे आणि ही ऑस्ट्रेलियासाठी चांगली बाब आहे. त्याचवेळी विश्वचषक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सनेही या विस्फोटक सलामीवीराचे कौतुक केले.

हेही वाचा: IND vs SA: राहुल द्रविडने स्वीकारला प्रशिक्षकपदाचा पदभार, टीम इंडिया झाली दक्षिण आफ्रिकेला रवाना, पाहा Video

कमिन्सने ट्रॅविस हेडचे कौतुक केले

कमिन्सने ट्रॅविस हेडचे कौतुक केले आणि म्हटले, “ट्रॅविस हेडने अंतिम सामन्यात दमदार खेळी खेळली आहे. ऑस्ट्रेलियन निवड समितीचे सदस्य अँड्र्यू मॅकडोनाल्ड आणि जॉर्ज बेली यांनाही बरेच श्रेय द्यायला हवे. हेडचा संघात समावेश का करायचा, यावर त्यांचा ठाम विश्वास होता. जखमी आणि अनफिट हेडचा संघात समावेश होताच, या निर्णयाचा उलटसुलट परिणाम होण्याची शक्यता होती, पण आता सर्व काही ठीक आहे.” कमिन्स पुढे म्हणाला, “त्याचे बोटाचे हाड तुटले होते, हात मुरगळला होता, त्याला संघात ठेवणे मोठे धोक्याचे होते. मात्र, तरीही आम्ही जोखीम पत्करली आणि आज त्याचे संघाला मिळाले.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stupid question ajay jadeja got angry on comparing travis head with virender sehwag said this avw
First published on: 06-12-2023 at 13:51 IST