इंग्लंडचा ट्वेन्टी-२० कर्णधार स्टुअर्ट ब्रॉड भारताविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेला मुकण्याची शक्यता आहे. वेगवान गोलंदाज ब्रॉडच्या डाव्या पायाच्या टाचेला दुखापती झाली आहे. पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यात खेळणाऱ्या ब्रॉडला मुंबईच्या कसोटीत दुखापत झाली. कोलकाता कसोटी सामन्यात तो खेळू शकला नाही. याचप्रमाणे चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यातही तो इंग्लंडच्या संघात असण्याची शक्यता कमीच दिसत आहे. ब्रॉड खेळण्याची शक्यता मावळल्यास ट्वेन्टी-२० मालिकेसाठी इंग्लंडला नवा कर्णधारही नेमावा लागणार आहे. ईऑन मॉर्गन त्याची जागा घेण्याची शक्यता आहे.
ट्वेन्टी-२० मालिकेला स्टुअर्ट ब्रॉड मुकण्याची शक्यता
इंग्लंडचा ट्वेन्टी-२० कर्णधार स्टुअर्ट ब्रॉड भारताविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेला मुकण्याची शक्यता आहे. वेगवान गोलंदाज ब्रॉडच्या डाव्या पायाच्या टाचेला दुखापती झाली आहे. पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यात खेळणाऱ्या ब्रॉडला मुंबईच्या कसोटीत दुखापत झाली.
First published on: 12-12-2012 at 02:25 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sturt brod may not play twenty 20 series