Suhas Yathiraj wins Silver Medal in Badminton at Paris Paralympics 2024 : सुहास यथिराजने पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये रौप्य पदक जिंकले आहे. पुरुष एकेरीच्या SL4 प्रकारातील अंतिम फेरीत त्याला फ्रान्सच्या लुकास माझूरविरुद्ध २१-९, २१-१३ असा पराभव पत्करावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्यामुळे सुवर्णपदकाच्या लढतीत त्याला निराशाजनक पराभवाला सामोरे जावे लागले. या स्पर्धेतील भारताचे हे एकूण १२ वे आणि बॅडमिंटनमधील एकूण चौथे पदक आहे. सुहासला या प्रकारात पहिले मानांकन मिळाले होते, पण सुवर्णपदकाच्या लढतीत त्याला निराशाजनक पराभवाला सामोरे जावे लागले होते.

सुहासकडून इतिहासाची पुनरावृत्ती –

सुहास पहिल्या गेमपासूनच संघर्ष करताना दिसला आणि एकेकाळी पहिल्या गेममध्ये तो १०-२ ने पिछाडीवर होता. यानंतर शेवटी त्याला २१-९ ने पराभव पत्करावा लागला. दुसऱ्या गेममध्येही त्याची अवस्था तशीच होती. सामन्याच्या शेवटच्या क्षणांमध्ये त्यांनी पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण अखेर त्याला २१-१३ असा पराभव स्वीकारावा लागला. गेल्या वेळीही टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुहासने पुरुष एकेरी SL4 प्रकारात रौप्य पदक जिंकले होते. योगायोगाने टोकियो पॅरालिम्पिकच्या अंतिम फेरीत त्याचा पराभव करणारा खेळाडू फ्रान्सचा लुकास मजूर होता. सुहास गेल्या वेळी २१-१५, १७-२१, १५-२१ असा पराभूत झाला होता.

D Gukesh How Much Prize Money Did Indian Grandmaster Win After Winning World Chess Championship
D Gukesh Prize Money: करोडपती झाला विश्विविजेता गुकेश, जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्यानंतर किती मिळाली बक्षिसाची रक्कम?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Who Is D Gukesh Indian Grandmaster Who Became Youngest Ever World Chess Champion
Who is D Gukesh: कोण आहे डी गुकेश? वडिलांनी करिअर लावलं पणाला अन् लेक १८व्या वर्षी ठरला विश्वविजेता; वाचा त्याची कहाणी
Smriti Mandhana Becomes the First Cricketer to Hit 4 Hundreds in Womens odis in a Calendar Year World Record
Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या नावे विश्वविक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली महिला फलंदाज
Syed Mushtaq Ali Trophy
SMAT 2024: मुंबई सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत! रहाणे-शॉच्या फलंदाजीसमोर विदर्भचा संघ पडला फिका
Loksatta Lokankika Five ekankika  in Mumbai zonal finals Mumbai news
मुंबई विभागीय अंतिम फेरीत पाच एकांकिकांची धडक
Kalidas hirve , Vasai National Marathon Competition,
वसईत रंगली राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा, साताऱ्याचा कालिदास हिरवे विजेता
anmol kharb
अनमोल, सतीशसह अश्विनी-तनिषा अंतिम फेरीत

भारताच्या बॅडमिंटनपटूची दमदार कामगिरी –

याआधी भारताच्या इतर ३ खेळाडूंनी बॅडमिंटनमध्ये पदके जिंकली आहेत. नितीश कुमार सुवर्ण, तुलसीमती मुरुगेसन रौप्य आणि मनीषा रामदासने कांस्यपदकावर नाव कोरले आहे. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताला बॅडमिंटनमध्ये फक्त एकच पदक मिळाले होते, पण पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये बॅडमिंटनपटूंनी एकूण ४ पदके जिंकली आहेत. सध्या भारताला आणखी २ बॅडमिंटनपटूंकडून पदकांची अपेक्षा आहे. आतापर्यंतची पाच दिवसांची कामगिरी पाहता भारतीय खेळाडू यावेळी सर्व जुने विक्रम मोडीत काढायला आले आहेत, असे वाटते.

हेही वाचा – Paralympics 2024 : महिला बॅडमिंटनपटूंची शानदार कामगिरी, तुलसीमतीने रौप्यपदक तर मनीषाने पटकावले कांस्यपदक

बॅडमिंटनचा प्रवास कसा सुरू झाला?

जो खेळ तो पूर्वी छंद म्हणून खेळायचा तो हळूहळू त्याची गरज बनला होता. ऑफिसचा थकवा दूर करण्यासाठी सुहास बॅडमिंटन खेळायचा, पण जेव्हा त्याने काही स्पर्धांमध्ये पदके जिंकायला सुरुवात केली, तेव्हा तो व्यावसायिकपणे खेळू लागला. २०१६ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय सामने खेळायला सुरुवात केली. चीनमध्ये खेळल्या गेलेल्या बॅडमिंटन स्पर्धेत सुहासला पहिला सामना गमवावा लागला, मात्र या पराभवाबरोबरच त्याला विजयाची सूत्रेही मिळाली आणि त्यानंतरही हा प्रवास सुरूच आहे.

Story img Loader