Sumit Nagal Struggling with Financial Crisis: देशातील नंबर वन टेनिसपटू सुमित नागलला सध्या आर्थिक चणचण सतावत आहे आणि त्यामुळे त्याला चांगले आयुष्य जगता येत नाही. एटीपी टूरमध्ये खेळण्यासाठी १ कोटी रुपयांच्या बजेटची व्यवस्था केल्यानंतर हरियाणातील नागलच्या बँक खात्यात आता ९०० युरो (सुमारे ८०,००० रुपये) शिल्लक आहेत.

गेल्या काही वर्षांपासून तो जर्मनीतील नॅन्सेल टेनिस अकादमीमध्ये सराव करत होता, परंतु निधीच्या कमतरतेमुळे तो २०२३च्या मोसमाच्या पहिल्या तीन महिन्यांत त्याच्या आवडत्या ठिकाणी सराव करू शकला नाही. त्याचा मित्र आणि माजी टेनिसपटू सोमदेव वर्मन आणि ख्रिस्तोफर मार्क्विस यांनी त्याला जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये मदत केली होती.

Sachin Tendulkar Cryptic post about Steve Bucknor
Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरच्या ‘त्या’ पोस्टने चाहत्यांच्या वाईट आठवणी झाल्या ताज्या, ‘हा’ अनुभवी अंपायर पुन्हा आला चर्चेत
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Shubman Gill injury update ahead Border Gavaskar Trophy
Shubman Gill : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटीतून शुबमन गिल बाहेर? पहिल्या सामन्यापूर्वीच भारताची वाढली डोकेदुखी
Tilak Verma becomes 2nd youngest player to score a T20I century for India
Tilak Verma : तिलक वर्माने वादळी शतक झळकावत घडवला इतिहास, भारतासाठी ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू
IND vs AUS Border Gavaskar Trophy Mike Hussey on Gautam Gambhir
IND vs AUS : ‘ते पहिल्याच सामन्यात कळेल…’, गंभीरने पॉन्टिंगची बोलती बंद केल्यानंतर माईक हसीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताला त्रास होईल…’
Champions Trophy Mohammed Hafeez Big Statement About India wont travel to Pakistan Said Somehow Not Secure for India
Champions Trophy: “भारतीय संघासाठी पाकिस्तान सुरक्षित नाही…”, पाकिस्तानच्या माजी खेळाडूच्या पोस्टने उडाली खळबळ, PCBला दाखवला आरसा
Suryakumar Yadav made big mistake in India lost the second T20I against South Africa
Suryakumar Yadav : कर्णधार सूर्यकुमार यादवची ‘ती’ चूक टीम इंडियाला पडली महागात, यजमानांनी भारताच्या तोंडचा घास हिरावला

बक्षिसाची रक्कमही खर्च केली

नागलने बक्षिसाची सर्व रक्कम, IOCL कडून मिळणारा पगार आणि महा टेनिस फाउंडेशनची मदत एटीपी टूरवर खेळण्यासाठी खर्च केली आहे. पाइन येथील सराव केंद्रात त्याचा मुक्काम, प्रशिक्षक किंवा फिजिओसोबत स्पर्धांना जाण्याचा त्याचा खर्च त्या रकमेतून भागवतो आहे. नागल म्हणाला, “माझ्या बँक खात्यात वर्षाच्या सुरुवातीला जेवढी रक्कम होती तेवढीच रक्कम आता माझ्याकडे आहे. माझ्या खात्यात फक्त ९०० युरो (अंदाजे ८०,००० रुपये) आहे. मला काही जणांकडून मदत मिळाली मात्र, माझा कोणताही मोठा प्रायोजक नाही.” पीटीआयशी बोलताना त्याने ही सर्व माहिती सांगितली.

हेही वाचा: Asian Games 2023, IND vs MAL: शफाली वर्माचे शानदार अर्धशतक! पावसामुळे सामना रद्द, टीम इंडिया चांगल्या रँकिंगच्या जोरावर पोहोचली सेमीफायनलला

एक कोटी रुपयांपर्यंत वार्षिक खर्च, ६५ लाख रुपये कमावले

नागलने यावर्षी २४ स्पर्धांमध्ये भाग घेतला ज्यातून त्याने सुमारे ६५ लाख रुपये कमावले. त्याची सर्वात मोठी बक्षीस रक्कम यूएस ओपनमधून आली जिथे तो पात्रता फेरीच्या पहिल्या फेरीत पराभूत झाला, परंतु तरीही त्याला US$ २२००० (अंदाजे १८ लाख रुपये) मिळाले. तो म्हणाला, “मी जे काही कमावतोय त्यातूनच सर्व खर्च करतो. माझा वार्षिक खर्च सुमारे ८० लाख ते १ कोटी रुपयांपर्यंत आहे आणि मी फक्त एका कोचने प्रवास करतो तेही मी जे काही कमावले आहे त्यातून खर्च करून करतो.”

मोठा प्रायोजक मिळाला नाही

नागल पुढे म्हणाला, “गेल्या काही वर्षांपासून भारताचा नंबर वन खेळाडू असूनही मला पुरेसा पाठिंबा मिळत नाही. टेनिसच्या एकेरीमध्ये ग्रँडस्लॅमसाठी पात्र ठरणारा मी एकमेव भारतीय खेळाडू आहे आणि गेल्या वर्षी ऑलिम्पिकमध्येही मी एक सामना जिंकला होता. असे असतानाही सरकारने माझा सर्वोतम खेळाडूंमध्ये समावेश केलेला नाही.” तो पुढे म्हणाला, “मला असे वाटते की जेव्हा दुखापतीमुळे माझे रँकिंग घसरले तेव्हा कोणीही मला मदत करायला आले नाही. मी पुनरागमन करू शकेन यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. हे खूप निराशाजनक आहे कारण, मला असे वाटते की मी काहीही जरी केले तरी ते पुरेसे नाही. भारतात आर्थिक मदत मिळणे खूप कठीण आहे. प्रामाणिकपणे सांगतो, मला पुढे काय करावे हे कळत नाहीये. मी हे सर्व सोडून द्यावे असे माझ्या डोक्यात विचार सुरु आहेत. मी आयुष्याशी लढताना हरलो आहे, असे वाटते.”

हेही वाचा: ICC T20 World Cup 2024: टी२० विश्वचषक २०२४साठी ICCने तीन ठिकाणांच्या नावांना दिली मान्यता, कोणते आहेत ते? जाणून घ्या

बचतीच्या नावावर काहीही नाही

नागल म्हणाला, “माझ्याकडे बचतीच्या नावावर काहीही नाही आणि आता माझा धीर सुटत चालला आहे. मी असे म्हणू शकत नाही की, मी खूप चांगले जीवन जगत आहे जिथे मला काम करण्याची गरज नाही. गेल्या दोन वर्षांत मी फारशी कमाई केलेली नाही.” नागल एटीपी एकेरी क्रमवारीत १५९व्या क्रमांकावर आहे, जे भारतीयांमध्ये सर्वोत्तम आहे.