नवी दिल्ली : ब्राझीलने महान फुटबॉलपटू पेले यांच्या ७७ गोलच्या विक्रमाची बरोबरी साधू शकल्याचा आनंद आहे. भविष्यात दीर्घकाळ संघासाठी असेच योगदान देण्यासाठी सर्वस्व पणाला लावेन, अशी प्रतिक्रिया भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने व्यक्त केली.

कारकीर्दीतील १२३व्या सामन्यात ३७ वर्षीय छेत्रीने नोंदवलेल्या गोलमुळे भारताने सोमवारी सॅफ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत नेपाळवर १-० असा विजय मिळवला. आंतरराष्ट्रीय पातळीवर सध्या खेळत असलेल्या फुटबॉलपटूंमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत छेत्री संयुक्तपणे तिसऱ्या स्थानी आहे. ‘‘माझ्या सातत्याविषयी नेहमीच प्रश्न उपस्थित केले जातात, परंतु मी कामगिरीद्वारेच उत्तर देतो. कारकीर्दीला सुरुवात केली, तेव्हा ७७ गोल झळकावू शकेन, असा विचारही केला नव्हता. मात्र दररोज केलेली मेहनत आणि सहकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे हे शक्य झाले,’’ असे छेत्री म्हणाला.

Story img Loader