कर्णधार सुनील छेत्री याने इंज्युरी वेळेत केलेल्या अप्रतिम गोलमुळेच भारतास दक्षिण आशियाई फुटबॉल स्पर्धेत बांगलादेशविरुद्धच्या साखळी सामन्यात १-१ अशी बरोबरी स्वीकारता आली. गतविजेत्या भारताने साखळी गटातील पहिल्या लढतीत पाकिस्तानवर १-० अशी मात केली होती. या लढतीच्या तुलनेत बांगलादेशच्या खेळाडूंनी भारतीय खेळाडूंना झुंजविले. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी अपेक्षेइतका अव्वल दर्जाचा खेळ केला नाही. ८२ व्या मिनिटाला अतिउर रहेमान मेशु याने बांगलादेशला १-० अशी आघाडी मिळवून दिली. याच आघाडीच्या जोरावर ते हा सामना जिंकणार असे वाटत असतानाच छेत्रीने इंज्युरी वेळेत गोल केला आणि संघास पराभवाच्या नामुष्कीतून सोडविले. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunil chhetri goal gives india 1 1 draw against bangladesh