Sunil Dev passed away at the age of 75: दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे (डीडीसीए) माजी सचिव सुनील देव यांचे बुधवारी दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी व मुले असा परिवार आहे. ७० च्या दशकाच्या उत्तरार्धापासून ते २०१५ पर्यंत डीडीसीएमध्ये असलेल्या देव यांनी बीसीसीआयच्या विविध उपसमित्यांवरही काम केले आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील २००७ टी-२० विश्वचषक चॅम्पियन संघाचे व्यवस्थापकही होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१९९६ च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात आणि २०१४ च्या इंग्लंड दौऱ्यात ते भारतीय संघाचे प्रशासकीय व्यवस्थापक होते. जन्मजात व्यंगचित्रकार देव यांनी डीडीसीएसाठी अनेक वर्ष काम केले आहे. देव यांनी डीडीसीएचे चांगले आणि वाईट अधिक स्पष्टपणे समोर आणले. डीडीसीएमधील विविध धोरणात्मक मुद्द्यांवर आपली विरोधाभासी मते मांडण्यास त्यांनी कधीही संकोच केला नाही. अशा प्रकारे त्यांना त्यांच्या कार्यकाळात मित्र आणि शत्रू दोन्ही समान प्रमाणात आढळले.

दिल्ली क्रिकेटमध्ये सुनील देव यांचा गौरव –

सुनील देव यांचा दिल्ली क्रिकेटमधील दबदबा यावरून कळू शकतो की १९९० ते २००० दरम्यान एक काळ असा होता की, त्यांच्या शिक्काशिवाय रणजी ट्रॉफी किंवा कोणत्याही वयोगटातील संघाची घोषणा केली जात नव्हती. त्यांच्या “द ग्रेट तमाशा” या पुस्तकात ‘द इकॉनॉमिस्ट’चे आशिया संपादक प्रख्यात पत्रकार जेम्स अॅस्टिल यांनी सुनील देव यांच्याशी झालेल्या त्यांच्या भेटीची आणि सामन्याच्या तिकीट विक्रीबद्दल बरेच काही सांगितले होते, ज्यामुळे त्यांना धक्काच बसला.

हेही वाचा – Manoj Tiwary Retirement: टीम इंडियाच्या फलंदाजाने विश्वचषकापूर्वी घेतली निवृत्ती, सोशल मीडियावर शेअर केली भावनिक पोस्ट

सुनील देव यांचे पत्रकारांशी चांगले जमायचे –

सुनील देव यांच्या कार्यशैलीबद्दल अनेक मनोरंजक कथा आहेत, परंतु काही काळाच्या ओघात शहरी मिथक बनल्या आहेत. जेव्हा ते पत्रकारांसोबत रिलॅक्स मूडमध्ये असत तेव्हा ते त्यांना मजेदार किस्से सांगत असत. विराट कोहली नावाचा १७ वर्षांचा मुलगा त्याच्या SUV मधून ड्रायव्हिंग कसा शिकला, हेही त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunil dev who was the manager of team india in 2007 passed away at the age of 75 vbm