Sunil Gavaskar on Team India: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये सलग दुसऱ्या पराभवानंतर टीम इंडियावर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. काहींनी याला पूर्वतयारीचा अभाव म्हटले तर काहींनी खेळाडूंच्या वर्कलोडचे व्यवस्थापन होत नसल्याचे सांगितले. पराभवाचे कारण स्पष्ट करताना कर्णधार रोहित शर्माने स्वतः सांगितले होते की, अशा सामन्याच्या तयारीसाठी संघाला किमान २०-२५ दिवसांचा अवधी हवा असतो. यावर भारताचे माजी दिग्गज खेळाडू सुनील गावसकर सहमत नाहीत. त्यांनी टीम इंडियाच्या फिटनेसवर काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सुनील गावसकर यांनी टीम इंडियाच्या फिटनेसवर नाराजी व्यक्त केली

इंडियन एक्स्प्रेसला सुनील गावसकरांनी एक मुलखात दिली आहे. त्यात गावसकर बोलताना म्हणाले, “रोहित शर्मा कोणत्या तयारीबद्दल बोलत आहे? वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे उदाहरण तुमच्यासमोर आहे. २०-२५ दिवसांचा हे काय कारण आहे? आता जो संघ वेस्ट इंडिजला गेला आहे, तो संघ एक दिवस आधी तिथे जाऊन त्यांना हरवू शकतो. अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही खरंच तयारीबद्दल बोलता तेव्हा मला आश्चर्य वाटते. तुम्ही १५ दिवस अगोदर जा, सराव सामने खेळा. तुमच्या मुख्य खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते परंतु राखीव खेळाडूंना संधी द्या. त्यांना स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळत नाही.”

हेही वाचा: Avinash Sabale: अविनाश साबळे पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र, भारताकडून अ‍ॅथलेटिक्समध्ये अशी कामगिरी करणारा ठरला सहावा खेळाडू

सुनील गावसकर यांनी वर्कलोडवर उत्तर दिले

माजी कर्णधार गावसकर पुढे म्हणाले, “सत्य हे आहे की संघातील प्रमुख खेळाडू लवकर बाहेर पडू इच्छित नाहीत. कारण त्यांना माहीत आहे की, जरी ते कसेही खेळले, त्यांची कामगिरी खराब असली तरी संघात निवड निश्चित आहे. जेव्हा संघ दौऱ्यावर लवकर निघतो तेव्हा कामाच्या ताणाबद्दल ते बोलायला सुरुवात करतात. तुम्ही स्वतःला सर्वात योग्य आणि सर्वोतम संघ म्हणता, मागच्या काही पिढ्यांमधला हा सर्वात योग्य संघ आहे असे म्हणताना ही अशी कामगिरी करतात. मग चांगला संघ इतक्या लवकर तुटून पडल्यावर कसे चालणार? २०-ओव्हर फॉरमॅटमध्ये तुम्हाला वर्कलोडची समस्या कशी असू शकते?

माजी खेळाडू गावसकर म्हणाले, “ हे टी२० मध्येच थकले पुढे आणखी कसोटी आणि वन डे सारख्या फॉरमॅटमध्ये अजून खेळायचे आहेत. तुम्ही जर टी२०मध्येच ४-५ तासात थकत असाल तर मग तुमच्या फिटनेसवर नक्कीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातील. संघाला वेळ हवा आहे, थकला आहे, रोटेशन पॉलिसीनुसार वर्कलोड या सर्व पराभवानंतर सांगायची कारणे आहेत.”

हेही वाचा: Wimbledon 2023: सामन्यादरम्यान नोव्हाक जोकोव्हिच संतापला, रागाच्या भरात त्याने असे काही केले की…; पाहा Video

सुनील गावसकर यांनी कपिल देव यांचे उदाहरण दिले

कपिल देव यांचे उदाहरण देत सुनील गावसकर म्हणाले की, “खेळाडू जिममध्ये न जाताही फिट राहू शकतो.” टीम इंडियाचा माजी कर्णधार म्हणाला, “कपिल देव कधी जिममध्ये गेल्याचे आठवत नाही. तो जमिनीवर धावायचा. वरच्या फळीत फलंदाजी करायचा आणि त्यानंतर गोलंदाजी करायचा. गावसकर यांनी निदर्शनास आणून दिले की, “आयपीएलमध्ये गोलंदाजांना नेटमध्ये फक्त २० चेंडू टाकण्यास सांगितले जाते. कारण, एका सामन्यात त्यांना २४ चेंडू टाकावे लागतात. यामागे कामाचा ताण असल्याचे सांगितले जात आहे. जर सरावापेक्षा सामन्यात जास्त चेंडू टाकले तर खेळाडूला अडचणी येतात”, असेही गावसकर पुढे सांगतात.