Sunil Gavaskar suggested names to BCCI for golden ticket: ५ ऑक्टोबरपासून विश्वचषकाला सुरुवात होत आहे. त्याचवेळी, या स्पर्धेचा अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. मात्र, आता सुनील गावसकर यांनी बीसीसीआयकडे एक मागणी केली आहे. सुनील गावसकर म्हणाले की, महेंद्रसिंग धोनी आणि इस्रो प्रमुख यांनाही गोल्डन तिकिटे मिळावीत अशी माझी इच्छा आहे.

बीसीसीआयने यापूर्वी बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांना गोल्डन तिकीट देण्यात आले होते. विश्वचषकाचे गोल्डन तिकीट मिळवणारे अमिताभ बच्चन हे पहिले व्यक्ती होते. यानंतर बीसीसीआयने सचिन तेंडुलकरला गोल्डन तिकीट दिले. १९८३ मध्ये भारताच्या पहिल्या विश्वचषक विजयात मोलाची भूमिका बजावणारे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी बीसीसीआयच्या या उपक्रमाचे कौतुक केले. आपापल्या क्षेत्रातील अग्रगण्यांचा सन्मान करण्याचा हा एक स्तुत्य मार्ग आहे, यावर त्यांनी भर दिला.

Karun Nair Smashed 88 Runs Against Maharashtra in Semi Final Vijay Hazare Trophy Innings
Karun Nair: करूण नायरचं विजय हजारे ट्रॉफीमधील वादळ कायम, सेमीफायनलमध्ये महाराष्ट्राच्या गोलंदाजांना दिवसा दाखवले तारे
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Indian Cricket Team To Get New Batting Coach In Gautam Gambhir Support Staff BCCI To Take New Decision
टीम इंडियाला मिळणार नवा फलंदाजी प्रशिक्षक? गौतम गंभीरच्या कोचिंगवर प्रश्नचिन्ह, BCCI मोठा निर्णय घेणार
Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
Bhaiyyaji Joshi of RSS said India should become super nation not superpower
भारत सुपरपाॅवर नव्हे, सुपरराष्ट्र होण्याची आवश्यकता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ भैय्याजी जोशी यांचे प्रतिपादन
Sunil Gavaskar and others felicitated by MCA at Wankhede Stadium
वानखेडे स्टेडियमचे योगदान महत्वाचे! सुनील गावस्कर यांची भावना; तारांकित खेळाडूंच्या उपस्थितीने क्रिकेट पंढरी दुमदुमली
bjp plan to contest local bodies elections alone after huge success in assembly elections
भाजप शत-प्रतिशतकडे; शिर्डीच्या महाविजयी मेळाव्यात दिशादर्शन; शहांची उपस्थिती
This is nation of Hindus their interests come first says Nitesh Rane
हे हिंदूंचे राष्ट्र, त्यांचे हित प्रथम – नितेश राणे

मात्र, ‘गोल्डन तिकीट’ मिळवणाऱ्यांसाठी गावसकर यांच्या मनात काही नावे होती. त्यांनी इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ ज्यांच्या नेतृत्वाखाली भारताने चंद्रावर ऐतिहासिक लँडींग केले. त्यांच्या नावाची शिफारस केली. याव्यतिरिक्त, गावस्कर यांनी बीसीसीआयने दोन प्रतिष्ठित विश्वचषक विजेते कर्णधार, कपिल देव आणि एमएस धोनी यांना गोल्डन तिकिटे देऊन सन्मानित करण्याची इच्छा व्यक्त केली. अलीकडच्या काळात देशाला गौरव मिळवून देणाऱ्या इतर नामवंत खेळाडूंचाही उल्लेख केला.

हेही वाचा – IND vs BAN: रवींद्र जडेजाचा आणखी एक मोठा पराक्रम, कपिल देव नंतर ‘हा’ कारनामा करणारा ठरला दुसराच भारतीय

स्पोर्टस्टारसाठीच्या त्यांच्या स्तंभात, गावसकर यांनी त्यांचे विचार व्यक्त करताना लिहले, “बीसीसीआय सचिव जय शाह यांनी त्यांच्या संबंधित क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या व्यक्तींचा सन्मान करणे हा एक चांगला निर्णय आहे. आतापर्यंत अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकर यांना वर्ल्डकपचे सामने पाहण्यासाठी गोल्डन तिकिटे मिळाली आहेत.”

सुनील गावसकर म्हणाले, “यादीतील अतिरिक्त लोकांची संख्या अज्ञात आहे. तथापि, यामध्ये इस्रोच्या संचालकांचा समावेश अपेक्षित आहे, ज्यांच्या नेतृत्वाखाली भारताने चंद्रावर उतरण्याची कामगिरी केली. त्या शहरांमध्ये होणार्‍या सामन्यांमध्ये सहभागी होण्यासाठी संघटनांना त्यांच्या संबंधित शहरांतील भारतीय खेळाडूंना आमंत्रित करण्याचे निर्देश दिले तर एक उल्लेखनीय उपक्रम ठरेल. अर्थात, दोन विश्वचषक चॅम्पियन कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि कपिल देव हे आणखी दोन खेळाडू गोल्डन तिकिटांसाठी पात्र आहेत.”

हेही वाचा – IND vs BAN: रोहित शर्माने रचला इतिहास, भारताकडून ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पाचवा खेळाडू

सुनील गावस्कर पुढे म्हणाले, “बीसीसीआयच्या गोल्डन तिकिटासाठी आणखी एक व्यक्ती ज्याच्या मनात येते, ती म्हणजे ऑलिम्पिक आणि जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप या दोन्ही स्पर्धांमध्ये सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा.”

Story img Loader