Sunil Gavaskar On Virat Kohli LBW Wicket : मागील तीन वर्षात धावांचा सूर न गवसलेला विराट कोहली गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये चमकदार कामगिरी करताना दिसत आहे. विराटने नुकतचं ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात शतकी खेळी केली होती. परंतु, विशाखापट्टणममध्ये आज झालेल्या एकदिवसीय सामन्यात विराटला ऑस्ट्रेलियाच्या नेथन एलिसने पायचीत केलं. भारताची सुरुवात खराब झाल्यानंतर विराटने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण नेथनने फेकलेल्या वेगवान चेंडूचा विराटला अंदाज घेता आला नाही आणि तो पायचीत झाला. विराट बाद झाल्यानंतर टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी यामागचं कारण सांगितलं आहे.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल मार्शने भारताचा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल आणि रोहित शर्माला स्वस्तात माघारी पाठवलं. त्यांच्या पाठोपाठ सूर्यकुमार यादव, के एल राहुलही स्टार्कच्या वेगवान गोलंदाजीवर पायचीत झाले. अशा कठीण परिस्थितही विराट कोहलीने सावध खेळी करून अप्रतिम फटके मारले. विराटने ३५ चेंडूत ३१ धावांची खेळी साकारली. मात्र, नेथन एलिसच्या गोलंदाजीवर अक्रॉस द लाईन खेळण्याच्या प्रयत्नात विराट पायचीत झाला. त्यानंतर विराटने डीआरएसबाबत जडेजाशी चर्चा केली. त्यानंतर विराटने डीआरएस घेतला नाही आणि तो ३१ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
इथे पाहा व्हिडीओ
विराट कोहली पायचीत झाल्यानंतर सुनील गावसकर काय म्हणाले?
विराट कोहली नेथन एलिसच्या गोलंदाजीवर पायचीत झाला, यावर प्रतिक्रिया देताना सुनील गावसकर यांनी सूचक विधान केलं आहे. ते म्हणाले, ” विराट पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळला. त्यालाही हे माहित असावं. अशा पद्धतीत खेळण्याचा प्रयत्न केल्यावर तो नेहमी बाद होतो. तो खेळपट्टीवर गेल्या काही दिवसांपासून अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न करतोय. मिड ऑनला नाही, तर स्क्वेअर लेगच्या दिशेनं विराट फटका मारण्याचा प्रयत्न करतो आणि संकटात सापडतो.”