Sunil Gavaskar on Rohit Sharma: विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्माने गेल्या फेब्रुवारीत भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधारपद स्वीकारले तेव्हा हिटमॅनकडून इतर दिग्गज क्रिकेटपटूंसारख्या सुनील गावसकर यांना देखील त्याच्याकडून खूप आशा होत्या. मात्र, भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियातील टी२० विश्वचषक फायनलसाठी पात्र ठरू शकला नाही, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल गमावली, आशिया चषक २०२२ आणि दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेत झालेली खराब कामगिरी, यामुळे त्यांनी रोहितच्या कॅप्टन्सीवर काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर यांनी खेळाडूंमधील सौहार्द आणि सामंजस्य यावर आपले मत व्यक्त केले आहे. गावसकर म्हणाले की, “संघसहकाऱ्यांमधील सौहार्दाचा अभाव दिसत असून ही बाब टीम इंडियाच्या दृष्टीने निराशाजनक आहे. हेच संघाची चांगली कामगिरी चांगली न होण्याचे संभाव्य कारण असू शकते. सध्याच्या नेतृत्वतात भारतीय संघ विखुरलेला दिसत आहे. आगामी विश्वचषकाचा विचार करता ही खूप गंभीर बाब आहे.”

chess olympiad india strongest team in budapest to win gold medal
सुवर्णयशाचे ध्येय! बुद्धिबळ ऑलिम्पियाडमधील भारताच्या मोहिमेस आजपासून प्रारंभ
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Ajit Agarkar to Sent Musheer Khan on Australia Tour with India A Squad Just After 7 Matches Impressed by His Innings
Musheer Khan: मुशीर खानच्या खेळीवर अजित आगरकर फिदा; फक्त ७ सामने खेळूनही जाणार ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर
pakistan hit & run case accused natasha danish
Video: पाकिस्तानमध्ये हिट अँड रन; बड्या उद्योगपतीच्या मुलीला पीडित कुटुंबानं केलं माफ, कायद्याच्या कचाट्यातून सुटका!
Madhabi Puri Buch
Madhabi Puri Buch : ‘सेबी’च्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांच्या अडचणीत वाढ? ‘हिंडनबर्ग’च्या आरोपांची लोकलेखा समितीकडून चौकशीची शक्यता
AP Dhillon Salman Khan
AP Dhillon : पंजाबी गायकाच्या कॅनडातील घराबाहेर गोळीबार, लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; सलमान खानचा उल्लेख असलेल्या पोस्टमुळे खळबळ!
Suryakumar Yadav Injury Updates in marathi
Suryakumar Yadav : बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेपूर्वी सूर्या दुखापतीतून सावरला नाही, तर कोण करणार टीम इंडियाचं नेतृत्त्व?
kevan parekh apple cfo
अ‍ॅपलचे नवे ‘सीएफओ’ भारतीय वंशाचे; कोण आहेत केवन पारेख?

माजी सलामीवीर सुनील गावसकर पुढे म्हणाले, “ही दुःखाची गोष्ट आहे कारण खेळ संपल्यानंतर तुम्ही एकत्र यायला हवे आणि कदाचित खेळाबद्दल बोलू नका पण विविध विषयांवर किमान गप्पा गोष्टीतरी करा. संगीताबद्दल बोला, कदाचित त्या चित्रपटांबद्दल बोला, तुम्हाला काय आवडते याबद्दल बोला, कदाचित तुमच्या आवडीबद्दल बोला. जर अंतराळात घडामोडींमध्ये तुम्हाला आवड असेल तर त्यावर बोला. मात्र, जर तुम्ही एकत्र येत नसाल तर भारतीय संघासाठी ही निराशाची आणि विचार करण्याची बाब आहे.” पुढे ते म्हणाले की, “२० वर्षांपूर्वी सुरू झालेली एक नवीन गोष्ट म्हणजे हॉटेलमध्ये प्रत्येक खेळाडूला एक स्वतंत्र खोली मिळते. हे देखील न मिसळल्याचे एक प्रमुख कारण असू शकते.”

हेही वाचा: Ashes 2023: भारतीय चाहत्यांवर टीका करणाऱ्या इंग्लिश समालोचकांना गावसकरांनी घेतले फैलावर, म्हणाले, “अ‍ॅशेसमध्ये तुमचे लोक…”

सुनील गावसकर रोहित शर्माच्या कॅप्टन्सीवर निराश झाले आहेत. त्यांनी राहुल द्रविड, विक्रम राठौर आणि पारस म्हांबरे यांच्या कोचिंग स्टाफवरही ताशेरे ओढले आहेत. त्यांना अधिक जबाबदार होण्याची मागणी केली होती. या आठवड्याच्या सुरुवातीला इंडियन एक्सप्रेस आयडिया एक्सचेंजमध्ये बोलताना गावसकर म्हणाले, “मला त्याच्याकडून (रोहित) अधिक अपेक्षा होत्या. भारतात परिस्थिती वेगळी आहे, परंतु जेव्हा तुम्ही परदेशात चांगली कामगिरी करता तेव्हा ती खरोखरच तुम्ही त्या कसोटीस पात्र ठरला हे सिद्ध होते. इथेच रोहितची कामगिरी थोडी निराशाजनक झाली आहे. टी२० फॉरमॅटमध्ये, आयपीएलचा सर्व अनुभव असूनही, कर्णधार म्हणून शेकडो सामने, सर्वोत्तम आयपीएल खेळाडूंच्या मिश्रणासह अंतिम फेरीत स्थान मिळवू न शकल्याने मी खूप निराश झालो आहे.”

गावसकरांना हे देखील जाणून घ्यायचे होते की निवडकर्ते आणि बीसीसीआयने भारताच्या पराभवाचा योग्य आढावा घेतला आहे का? गेल्या महिन्यात भारताच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवाबद्दल विशेषत: बोलताना ते म्हणाले की, “प्रशिक्षक द्रविड आणि कर्णधार रोहित यांना त्यांनी घेतलेल्या निर्णयांचे स्पष्टीकरण विचारायला हवे होते.”

हेही वाचा: Virat Kohli: कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी द्रविडसोबतचा फोटो शेअर करत विराट झाला भावूक; म्हणाला, “कधी विचार केला नव्हता…”

“त्याने प्रश्न विचारला पाहिजे, तू प्रथम क्षेत्ररक्षण का केले? तसेच, नाणेफेकीच्या वेळी ढगाळ वातावरण असल्याचे सांगण्यात आले. मग प्रश्न असा असावा की, शॉर्ट बॉलवर ट्रॅव्हिस हेडच्या कमकुवतपणाबद्दल तुम्हाला माहिती नव्हती? जेव्हा त्याने ८० धावा केल्या तेव्हाच बाउन्सर का? तुम्हाला माहिती आहे, हेड बॅटिंगला येताच रिकी पाँटिंग कॉमेंट्री बॉक्समध्ये म्हणत होता, ‘त्याला बाऊन्स गोलंदाजी करा. सर्वांना हे माहित होते पण आम्ही प्रयत्न केला नाही.” असे अनेक प्रश्न विचारत गावसकरांनी टीम इंडियावर धारेवर धरले.