Sunil Gavaskar’s prediction about India’s future captain: भारताचे माजी कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या भावी कर्णधाराबद्दल आपले मत मांडले आहे. स्पोर्ट्स टुडेशी बोलताना माजी कर्णधाराने दोन नावे सांगितली आहेत, जी पुढे जाऊन भारतीय संघाचे नेतृत्व करू शकतात. गावसकर यांनी पहिले शुबमन गिलचे नाव घेतले, तर दुसरे अक्षर पटेलचे नाव घेतले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आपले म्हणणे मांडताना गावसकर म्हणाले, “पहिले नाव नक्कीच गिलचे आहे, जरी त्याने कधीही कर्णधारपद भूषवलेले नसले तरी त्याच्याकडे १९ वर्षांखालील संघाचे उपकर्णधारपदाचा अनुभव आहे. मला वाटते की गिल पुढे जाऊन भारताचे कर्णधार करू शकेल. ” त्याचवेळी, अक्षरने आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी उपकर्णधारपद भूषवले आहे. त्याच्याकडे अनुभव आहे. माझ्या मते, हे दोन खेळाडू भारतीय क्रिकेट संघाचे पुढील कर्णधार होऊ शकतात.”
याशिवाय सुनील गावसकर इशान किशनबद्दल म्हणाले की, “या दोन खेळाडूंशिवाय मी इशानकडे पाहतो, पण इशानला प्रथम प्लेइंग इलेव्हनमधील स्थान कायम राखावे लागेल. त्याच्याकडे क्षमताही आहे.” १२ जुलै पासून भारताचा वेस्ट इंडिज दौरा सुरु होणार आहे. यासाठी भारताचा वनडे आणि कसोटी संघ जाहीर केला आहे.
हेही वाचा – Sanju Samson: “…तर मी खूप निराश होईन”, रवी शास्त्रींचे संजू सॅमसनबद्दल मोठं वक्तव्य
त्याचबरोबर गावसकरांनी यशस्वी जैस्वालची वनडे संघात निवड न झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले नाही. आयपीएलमध्ये जैस्वालने ज्याप्रकारे कामगिरी केली होती, त्याचप्रमाणे ते पाहता वनडे संघातही असणे अपेक्षितच होते. सुनील गावसकर यांना खात्री आहे की, पुढे जाऊन त्याला छोट्या फॉरमॅटमध्येही संधी मिळेल. याशिवाय संजू सॅमसनचा वनडे संघात समावेश झाल्यामुळे माजी दिग्गज खेळाडू आनंदी आहे.
भारतीय वनडे संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भारत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी
भारतीय एकदिवसीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, चहल. कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार