भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना काल २१ जानेवारी रोजी पार पडला. रायपूर येथील शहीद वीर नारायण स्टेडियमवर खेळला गेलेल्या सामन्यात भारताने ८ गडी राखून विजय नोंदवला. या सामन्यात भारताकडून रोहित शर्मा ५१ आणि शुबमन गिलने नाबाद ४० धावा केल्या. या खेळीनंतर शुबमन गिलला माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी एक टोपणनाव दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय संघाने वनडे मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने प्रथम किवी संघाला ३४.३ षटकांत अवघ्या १०८ धावांत गुंडाळले. त्यानंतर २०.१षटकांत केवळ दोन विकेट्स गमावून लक्ष्य पार केले.

भारताकडून गिलने पहिल्या वनडेत कारकिर्दीतील पहिले द्विशतक झळकावले होते. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात सातत्यपूर्ण कामगिरीनंतर नाबाद ४० धावांचे योगदान दिले. त्यामुळे भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी गिलचे कौतुक केले आहे. गावस्कर यांनी गिल याला नवीन टोपणनावही दिले आहे.

सामना संपल्यानंतर सुनील गावसकर शुबमन गिलला मुलाखतीत म्हणाले, “मी तुम्हाला ‘स्मूथमॅन गिल’ हे नवीन टोपणनाव दिले आहे.” मला आशा आहे की तुम्ही वाईट नाही मानणार.” गावस्कर यांच्या या वक्तव्यावर गिल यांनीही जबरदस्त प्रतिक्रिया दिली आहे. भारताच्या सलामीवीराने गावसकरांना प्रत्युत्तर देताना म्हणाला की, “सर, मला कधीच वाईट वाटणार नाही.”

हेही वाचा – VIDEO: ”फक्त ‘ती’ गोष्ट केलीस तर जगावर राज्य करशील”; मोहम्मद शमीने उमरान मलिकला दिला लाखमोलाचा सल्ला

दुसऱ्या वनडे सामन्यात गिलने ५३ चेंडूत ६ चौकार मारले. त्याचवेळी रोहितने ५० चेंडूंत ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५१ धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याचबरोबर विराट कोहलीनेही ११ धावांचे योगदान दिले. तसेच गोलंदाजीत मोहम्मद शमीने ३ विकेट्स घेतल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunil gavaskar named shubman as smoothman gill as his new nickname vbm