मे महिन्यात इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना भारतीय संघात कोणाला जागा मिळणार याबाबत सर्वत्र चर्चा सुरु आहे. सलामीवीर रोहित शर्मा आणि आणि शिखर धवन यांच्या कामगिरीत असलेला सातत्याचा अभाव हा भारतीय संघासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. त्यामुळे विश्वचषकासाठी एका पर्यायी सलामीवीराचा संघात समावेश करणं हे भारतीय संघासाठी गरजेचं बनलं आहे. अशावेळी दिनेश कार्तिक हा विश्वचषकासाठी पर्यायी सलामीवीर ठरु शकतो असं मत माजी कर्णधार सुनिल गावसकर यांनी व्यक्त केलं आहे.
अवश्य वाचा – परदेशी खेळपट्ट्यांवर कुलदीप यादव सर्वोत्तम फिरकीपटू – रवी शास्त्री
माझ्या मते दिनेश कार्तिक इंग्लंडमध्ये पर्यायी सलामीवीर म्हणून चांगली कामगिरी करु शकतो. कार्तिकमुळे संघात 3 यष्टीरक्षक येत असतील तर त्यात गैर काय आहे. याचसोबत ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यात ऋषभ पंतलाही संघात जागा देण्यास हरकत नसल्याचं गावसकरांनी स्पष्ट केलं. ते Star Sports क्री़डा वाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते. दीर्घ कालावधीनंतर भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या दिनेश कार्तिकने 26 कसोटी, 91 वन-डे आणि 27 टी-20 सामन्यांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे.
अवश्य वाचा – अंबाती रायुडूला विश्वचषक संघात स्थान मिळेल !